---Advertisement---

टी20 विश्वचषकात नव्या अवतारात दिसणार भारतीय संघ, जर्सीचा पहिला लूक आला समोर

On: मंगळवार, सप्टेंबर 13, 2022 3:36 PM
Team-India-New-Jersey
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकाची सुरुवात होण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाईल. तत्पूर्वी विश्वचषकात सहभागी सर्व संघ तयारीला लागले आहेत. जवळपास सर्वांनी विश्वचषकासाठीचे त्यांचे संघ घोषित केले आहेत. भारतीय संघानेही सोमवारी (12 सप्टेंबर) त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यानंतर आता त्यांनी विश्वचषकासाठीच्या नव्या जर्सीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. 

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखालील भारतीय संघ टी20 विश्वचषकात पूर्णपणे वेगळ्या जर्सीत (Team India’s New Jersey) दिसणार आहे. या जर्सीचा पहिला लूक पुढे(Jersey First Look) आला आहे. भारतीय संघाची किट स्पॉनर्स एमपीएल स्पोर्ट्सने भारतीय संघाच्या नव्याकोऱ्या जर्सीची झलक दाखवली आहे.

एमपीएल स्पोर्ट्सने त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर भारतीय संघाच्या जर्सीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. एमपीएल स्पोर्ट्सने नव्या जर्सीचा पहिला लूक शेअर करताना लिहिले की, ‘तुम्ही आम्हाला चीयर करत नसाल तर खेळ खेळासारखा वाटत नाही.’

या व्हिडिओत कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि फलंदाज श्रेयस अय्यर दिसत आहेत. त्यांची जर्सी जुन्या जर्सीपेक्षा बरीच वेगळी आहे. भारतीय खेळाडू परिधान करत असलेली सध्याची जर्सी नेव्ही ब्लू रंगाची आहे. परंतु टी20 विश्वचषकासाठी भारतीय खेळाडू स्काय ब्लू रंगाची जर्सी घालताना दिसू शकतात. अद्याप या जर्सीचे अनावरण झालेले नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नव्या जर्सीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

https://twitter.com/mpl_sport/status/1569577628625154048?s=20&t=N4NfS2k4GpESZVQUFjKdNQ

टी२० विश्वचषकासाठी असा आहे १५ सदस्यीय भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि आर अश्विन.
स्टॅंडबाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, अशी काय टीम निवडलीये? अश्विनपेक्षा दुप्पटीने विकेट्स घेऊनसुद्धा ‘तो’ टी20 विश्वचषक संघाबाहेर
क्रिकेट कारकिर्दीत 5 शतके ठोकणाऱ्या ‘या’ भारतीय यष्टीरक्षकाचे निधन
क्रिकेटर अर्जुनने महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीला केले फिल्मी स्टाईल प्रपोज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---