भारताचे अव्वल दुहेरी बॅडमिंटनपटू सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी आपला दमदार फॉर्म कायम राखला आहे. रविवारी (23 जुलै) झालेल्या कोरिया ओपनच्या अंतिम सामन्यात त्यांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या फजार अल्फीयान व मोहम्मद रियान यांचा तीन गेम पर्यंत झालेल्या थरारक सामन्यात 17-21,21-13,21-14 असा पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. या जोडीने मागील आठवड्यातच कॅनडा ओपनचे विजेतेपद जिंकले होते.
या सामन्यात प्रवेश करण्याआधी भारतीय जोडीला विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते. परंतु, अव्वल मानांकित जोडी त्यांना झुंज देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. इंडोनेशियाच्या जोडीने आपला अनुभव दाखवताना या सामन्याच्या सुरुवातीलाच आघाडी बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिला गेम 17-21 असा आपल्या नावे करत आघाडी मिळवली. मात्र, भारतीय जोडीने पुनरागमन करताना दुसऱ्या गेममध्ये 21-13 असा सहज विजय अखेरच्या व निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला पुनरागमनाची संधी न देता 21-14 असा विजय मिळविला
भारतीय जोडी मागील काही काळापासून सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडीने कॅनडा ओपन स्पर्धा आपल्या नावे केली होती.
(Indian Shuttlers Satwik Sairaj And Chirag Shetty Win Korea Open)
आणखी वाचा:
पाकिस्तानविरुद्धच्या फायनलची नाणेफेक भारताच्या पारड्यात! टीम इंडिया करणार प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेइंग इलेव्हन
पंचांशी वाद पडला महागात, पुढचे 24 महिने हरमनप्रीतला सावध रहावं लागणार