भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आगामी बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी खेळली जाणार आहे. तत्पूर्वी भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) खुलासा केला आहे की, 2 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नच्या (Shane Warne) निधनानंतर त्याला असं वाटलं की, आपण कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या कुलदीपनं त्याच्या आदर्श क्रिकेटपटूचे होम ग्राउंड असलेल्या आयकॉनिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (MCG) भेट दिली, जिथं त्यानं स्टेडियमबाहेर वॉर्नच्या पुतळ्यासोबत फोटो काढला. कुलदीप यादव म्हणाला, “शेन वॉर्न हा माझा आदर्श होता आणि माझं त्याच्याशी खूप घट्ट नातं होतं. जेव्हा मी वॉर्नचा विचार करतो तेव्हा मी भावूक होतो. मी माझ्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्यासारखं वाटतं. मी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची वाट पाहत आहे.
पुढे बोलताना कुलदीप यादव (Kuldeep Yadav) म्हणाला की, “या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धेची आम्हाला अपेक्षा आहे. जगभरातील भारतीय क्रिकेट चाहते नेहमीच संघाला पाठिंबा देतात आणि मला खात्री आहे की ते बॉर्डर-गावसकर ट्राॅफी, विशेषत: बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी येथे मोठ्या संख्येने येतील.”
Kuldeep Yadav in front of the Shane Warne statue in Melbourne. 💥 pic.twitter.com/sQgCf031dr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 23, 2024
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वाॅर्नचं (Shane Warne) 2022 मध्ये हृदयविकारच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 145 कसोटी, 194 एकदिवसीय सामने खेळले. 145 कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजीची जादू दाखवत त्यानं 25.41च्या सरासरीनं 708 विकेट्स त्याच्या नवावर केल्या. यादरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 2.65 राहिला. कसोटीच्या एका डावात त्यानं वयक्तिक सर्वाधिक 8 विकेट्स तर एका सामन्यात 12 विकेट्स घेतल्या होत्या.
वाॅर्ननं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1993 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 194 एकदिवसीय सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 25.73च्या सरासरीनं 293 विकेट्स घेतल्या. दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 4.25 राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात 33 धावा देऊन 5 विकेट्स घेणं ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड क्रिकेटला मिळाला नवा स्टार खेळाडू! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून मोडला 94 वर्ष जुना विक्रम
ऑस्ट्रेलियाकडून खेळणार भारतीय वंशाच्या 3 क्रिकेटपटू, ‘या’ क्रिकेट मालिकेत घडणार नवीन पराक्रम
काय सांगता! 5 नव्हे तर चक्क 6 दिवस चालेल एक कसोटी सामना! काय आहे कारण?