येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. तर न्यूझीलंड संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या सामन्यात दोन्हीही संघ विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तत्पुर्वी आजी-माजी क्रिकेटपटू विजयी संघाबद्दल आपली मते मांडत आहेत. अशातच भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलनेही सांगितले आहे की, या सामन्यात कोणता संघ बाजी मारू शकतो?
भारताकडून १०२ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या युजवेंद्र चहल याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “दोन्हीही संघ मजबूत संघ आहेत. तरीही मला वाटते की, भारतीय संघ हा सामना जिंकेल. तिथे वेगवान गोलंदाजाना मदत मिळणारी खेळपट्टी असेल. भारतीय संघात विश्वातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही न्यूझीलंड संघाविरुद्ध सकारात्मक बाब असेल.”
चहलने अजुनपर्यंत भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळले नाहीये. याबाबत बोलताना तो म्हणाला, “खरं सांगू तर मी संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. माझे काम आहे चांगले प्रदर्शन करणे. मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत स्वतःला सिद्ध केले आहे. मी आधीपेक्षा जास्त समजूतदार झालो आहे. मला आता कळत आहे की, दबाव कसा सहन करायचा आणि दबावात कशाप्रकारची गोलंदाजी करावी. मी कुठल्याही परिस्थितीत गोलंदाजी करू शकतो. जे मी रोज शिकतोय.”
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), रिद्धीमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा सेहवागने पाकिस्तानचा उडवला होता धुव्वा, २ चेंडूत २१ धावा चोपण्याचा केलता करिश्मा
आई-वडिलांचे स्वप्न होते डॉक्टर बनवण्याचे, पण ‘हा’ खेळाडू बनला घातक फिरकीपटू
क्रिकेट खेळण्यासाठी ‘सिक्स पॅक ऍब्ज’ची गरज नाही; धोनीच्या भिडूचा १०० किलोच्या खेळाडूला पाठिंबा