भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी चांगल्या खेळीचे प्रदर्शन केले. भारताला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी अनूकुल परिस्थिती होती, पण न्यूझीलंडचे तळातील फलंदाज शेवटच्या दिवशी खेळपट्टीवर कायम राहील्यामुळे सामना अनिर्णीत झाला. भारतासाठी अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने महत्वाचे योगदान दिले. त्याने या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. सामना संपल्यानंतर त्याने श्रेयस अय्यरसोबत बोलताना खास प्रतिक्रिया दिली.
पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर श्रेयस अय्यरने बीसीसीआय टीव्हीसाठी अश्विनची मुलाखत घेतली. यावेळी अश्विनला काही दिवसांपूर्वी त्याच्या पुढच्या कारकिर्दीविषयी चिंता वाटत होती, असा खुलासा केला आहे. तो मुलाखतीदरम्यान अश्विन म्हटला की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर कोरोना महामारी आणि लॉकडाउनमध्ये माझे आयुष्य आणि माझ्या कारकिर्दीत मागच्या काही वर्षांपासून जे काही होत होते, मला माहीत नव्हते की, मी पुन्हा कसोटी क्रिकेट खेळेल की नाही.”
“मी क्राइस्टचर्चमध्ये २९ फेब्रुवारी २०२० ला सुरू झालेला शेवटचा कसोटी सामना खेळलो होतो. मी पुन्हा कसोटी खेळू शकेल की नाही, याबाबत मी संभ्रमात होतो. माझे भविष्य काय आहे, मला कसोटी संघात जागा मिळेल का, कारण मी त्याच प्रकारात खेळत होतो. ईश्वर दयाळू आहे आणि आता परिस्थिती एकदम बदलली आहे,” असे अश्विन म्हणाला.
दरम्यान, अश्विन आयपीएलमध्ये यापूर्वी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळला आहे. यावेळी अश्विन श्रेयसच्या नेतृत्वात खेळण्याविषयी देखील बोलताना म्हणाला की, “मी दिल्ली कॅपिटल्स संघात आलो आणि तू (श्रेयस) जेव्हा कर्णधार होता, तेव्हापासून परिस्थिती बदलू लागली”
दरम्यान, अश्विनने या सामन्यात त्याचे ४१९ कसोटी विकेट्स पूर्ण केले आणि दिग्गज हरभजन सिंगला सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या यादीत मागे टाकले. आता अश्विन भारतासाठी कसोटीतील तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. अश्विनने मुलाखतीत पुढे बोलताना सांगितेल की, त्याने हरभजनकडून प्रेरणा घेतली आणि त्यानंतर फिरकी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होती, त्याआधी तो एक फलंदाज होता.
तसेच त्याने या सामन्यात भारतीय संघाच्या हातातून सोपा विजय निसटल्यामुळे खंत व्यक्त केली. तो म्हणाल, विश्वास बसत नाहीय की, आपण जिंकू शकलो नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘भावा, आपण करून दाखवलं’, पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचे हिरो ठरलेल्या एजाज-रवींद्रची खास मुलाखत
“केएल राहुलने पंजाब किंग्ज संघ सोडला, तर ‘या’ खेळाडूला बनवा नवा संघनायक”
जहाँ जाऊँ, तुझे पाऊँ..! उतावळा शार्दुल साखरपुड्यात मितालीसोबत भलताच रोमँटिक, व्हिडिओ पाहाच