भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताला २ सामन्यात पराभव पत्करावा लागला. परंतु तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला. वनडे मालिकेत भारतीय गोलंदाज वर्चस्व राखण्यात अपयशी ठरले. कोणत्याही भारतीय गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही. गोलंदाजांच्या खराब प्रदर्शनामुळेच भारताने वनडे मालिका गमावली, अशी चर्चा आहे. आता या मुद्यावर भारतीय क्रिकेट संघाच्या माजी दिग्गजाने मोठे विधान केले आहे.
धोनीच्या अनुपस्थितीत गोलंदाज करत आहेत संघर्ष- किरण मोरे
भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू व्ही रमण यांच्याशी चर्चा करताना म्हणाले की, “एमएस धोनी भारतीय संघात खेळत असताना, तो यष्टीमागून गोलंदाजांना सतत मार्गदर्शन करायचा. चेंडू कसा फेकायचा, कोणत्या लाईन आणि लेंथवर फेकायचा, याबाद्दल सर्व माहिती तो गोलंदाजांना यष्टीमागून हिंदी भाषेत सांगायचा. आता धोनीच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करत नाहीत. ते संघर्ष करताना दिसत आहेत.”
परंतु धोनीच्या अनुपस्थितीत आता कोहलीला…
एमएस धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्त्वपद स्वीकारले होते. मात्र, त्यानंतरही धोनी गोलंदाजांना सतत मार्गदर्शन करत होता. याबद्दल बोलताना किरण मोरे म्हणाले की, “धोनीने दहा ते बरा वर्षे हे कार्य केलं, जेणेकरून विराट कोहली डीपमध्ये क्षेत्ररक्षण करू शकेल. परंतु धोनीच्या अनुपस्थितीत गोलंदाजांशी चर्चा करण्यासाठी आता कोहलीला एक्स्ट्रा कव्हर किंवा मिड-ऑफवर क्षेत्ररक्षण करावे लागते.”
चहल, जडेजा, कुलदीप यांना प्रत्येकी फक्त एक गडी बाद करण्यात आले यश
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत चहल, जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजीविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाज चांगलेच प्रभावी ठरले.
वनडे मालिकेत फक्त एका सामन्यात खेळणाऱ्या कुलदीला फक्त एक बळी घेण्यात यश आले. जडेजाने या मालिकेत तीन सामने खेळले. त्याने तब्बल 180 धावा दिल्या आणि एक गडी बाद केला. युझवेंद्र चहलने दोन वनडे सामने खेळले आणि 160 धावा केल्या. त्यालाही फक्त 1 बळी घेण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हम तो उड गए’, पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ केला सचिनने शेअर
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
VIDEO: ऑस्ट्रेलियाच्या नवोदित अष्टपैलूचा दणका; शतकी खेळीनंतर ‘पृथ्वी शॉ’ला केले सापळा रचून बाद
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू