भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान खेळली गेलेली पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने ४-१ने जिंकली आहे. लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर रविवारी प्रतिष्ठेच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ८८ धावांनी मोठा विजय मिळवला. टीम इंडियासाठी या सामन्यात श्रेयस अय्यर (६४) आणि दीपक हुडा (३८) यांनी फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. यानंतर गोलंदाजी करताना फिरकीपटूंनी यजमान संघाची संपूर्ण फलंदाजी उद्ध्वस्त केली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई हे फिरकी त्रिकूट जबरदस्त लयीत दिसले. संघासाठी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याच वेळी तरुण बिश्नोईने सर्वाधिक चार बळी मिळवले. भारतीय फिरकीपटूंनी आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर इतिहास रचला आहे.
Ravi Bishnoi 4/16
Kuldeep Yadav 3/12
Axar Patel 3/15First time ever spinners have taken all ten wickets in an innings in T20 Internationals.
— Deepu Narayanan (@deeputalks) August 7, 2022
खरं तर, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, भारतीय संघाच्या फिरकीपटूंना विरोधी संघाच्या १०व्या खेळाडूंना बाद करण्यात यश आले. म्हणजेच या सामन्यापूर्वी कोणत्याही संघाचे फिरकीपटू विरोधी संघातील सर्व खेळाडूंना बाद करू शकले नाहीत. पाचव्या टी-२० सामन्यापूर्वी, फिरकीपटूंनी सामन्याच्या एका डावात सात वेळा नऊ बळी घेतले होते, परंतु संपूर्ण संघाला बाद करण्यात त्यांना यश आले नाही. भारतीय फिरकीपटूंनी २०१४मध्ये मीरपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ विकेट घेतल्या होत्या. त्या वेळी १० विकेट्स घेण्यापासून संघ फक्त एक विकेट दूर होता.
दरम्यान, पाचव्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाने मालिकेत विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले. यातील प्रमुख बदल म्हणजे कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळताना दिसला नाही. त्याच्या जागी थेट हार्दिक पंड्याने टीम इंडियाचे नेतृत्व केले. याशिवाय रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारही सामन्यात खेळताना दिसले नाहीत. त्यांच्या जागी दिपक हुड्डा, कुलदिप यादव, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांसारख्या खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-