चीनमध्ये होणाऱ्या हॅंगझू एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष व महिला फुटबॉल संघाचा सहभाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाने विशेष सूट देत भारतीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांनी क्रीडा मंत्रालयाला केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमानुसार एशियन गेम्समध्ये केवळ तेच संघ सहभागी होऊ शकतात, जे सांघिक खेळांच्या क्रमवारीत आशियामध्ये पहिल्या आठ संघात असतात. सध्या भारताचे पुरुष व महिला असे दोन्ही फुटबॉल संघ पहिल्या आठमध्ये नाहीत. त्यामुळे भारतीय संघाला एशियन गेम्समध्ये सहभागी होता येत नव्हते. या नियमामुळे खेळाडूंची संधी चुकूनही याकरता भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांनी क्रीडा मंत्रालय तसेच पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करून खेळाडूंना स्पर्धेसाठी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केलेली.
बुधवारी (26 जुलै) क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत सांगितले,
‘भारतीय फुटबॉल संघांची नजीकच्या काळातील कामगिरी पाहता त्यांना एशियन गेम्ससाठी पाठवण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे. खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करत देशाचे नाव उज्वल करतील.”
भारतीय पुरुष फुटबॉल संघाने मागील महिन्यात सलग तीन स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. नेशन्स कप, इंटरकॉन्टिनेन्टल कप व सॅफ कप अशा सलग तीन स्पर्धा त्यांनी जिंकल्या होत्या. तसेच, महिला संघ देखील सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आला आहे.
(Indian Sports Ministry Allowed Men’s And Women’s Football Team For Hangzhou Asian Games)
महत्वाच्या बातम्या –
जेम्स अँडरसनबाबत धक्कादायक ब्रेकिंग! निवृत्तीविषयी स्पष्टच बोलला वेगवान गोलंदाज, म्हणाला…
युवा फलंदाजांचे पाकिस्तानसाठी शतक आणि द्विशतक, श्रीलंका जवळपास 400 धावांनी मागे