अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला भारत अ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात गुरुवारी (22 सप्टेंबर) तीन सामन्यांची एखदिवसीय मालिका सुरू झाली. या मालिकेत सॅमसन भारताचे नेतृत्व करताना दिसला. असे असले तरी, आगामी टी-20 विश्वचषकात मात्र त्याला संधी दिली गेली नाहीये. बीसीसीआयने निवडलेल्या 15 सदस्यीय संघात सॅमसनचे नाव नसल्यामुळे चाहते नाराजी व्यक्त करत आहे. अशातच त्याने स्वतः देखील याविषयी नाराजी बोलून दाखवली आहे.
संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या मते भारतीय संघास स्थान बनवणे खूप कठीण आहे आणि यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका पार पाडता आल्या पाहिजेत. त्याने सांगितल्यानुसार तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, पण तरीही त्याला टी-20 विश्वचषकाच्या संघात निवडले गेले नाहीये. माध्यमांशी बोलताना सॅमसन म्हणाला, “मी मागच्या मोठ्या काळापासून वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. मी सहजपणे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तुम्ही स्वतःला एका क्रमांकापुरते मर्यादित ठेवले नाही पाहिजे. तुम्ही असे म्हणू शकत नाही की, मी एक सलामीवीर फलंदाज आहे किंवा मी एक फिनिशर आहे. मागच्या तीन-चार वर्षांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये खेळताना माझ्या खेळात नवीन गोष्टी जोडले गेले आहेत.”
“हे एक आव्हान आहे. भारतीय संघात स्थान शोधने खरोखर एक मोठे आव्हान बनले आहे. संघात सहभागी असलेल्या खेळाडूंमध्ये खूप प्रतिस्पर्धा आहे. जेव्हा या गोष्टी होतात, तेव्हा स्वतःवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. मी ज्या पद्धतीचे प्रदर्शन करत आहे, त्यावर समाधानी आहे. पण मला अजून सुधारणा करायच्या आहेत,” असेही सॅमसन पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, सॅमसनने भारतीय संघासाठी 2015 मध्ये पदार्पण केले. पण त्याला पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी जुलै 2021 पर्यंत वाट पाहावी लागली. त्याने आतापर्यंत खेळळेल्या 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 296 धावांची नोंद आहे. सॅमसनची आयपीएलची आकडे वारी पाहिली तर ती अधिक चांगली आहे. त्याने खेळलेल्या 138 आयपीएल सामन्यांमध्ये 29.14 च्या सरासरीने 3526 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंचांच्या चुकीमुळे इतिहासात दुसऱ्यांदा कसोटी टाय झाली
आता मेंटर बनणार युवी? प्रतिष्ठित लीगमध्ये ‘या’ संघाने दिली ऑफर
एमएसएलटीए बी1 आशियाई कुमार टेनिस चार भारतीय खेळाडूंचा उपांत्य फेरीत प्रवेश