आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ या स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा (19 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. परंतु तरीही या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली नाही. आता भारतीय नियामक मंडळ (BCCI) भारतीय संघाची घोषणा उद्या म्हणजेच शनिवारी (18 जानेवारी) रोजी करेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, भारतीय संघाला इंग्लंडविरूद्ध व्हाईट बॉल मालिकाही खेळायची आहे, ज्यामध्ये 5 टी20 आणि 3 वनडे सामने खेळवले जातील. टी20 मालिका (22 जानेवारी) पासून सुरू होईल, ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, परंतु वनडे मालिकेची घोषणा अद्याप झाली नाही. इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा एकाच वेळी केली जाईल.
निवड बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल. ही परिषद दुपारी 12:30 वाजता आयोजित केली जाईल. या परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) सहभागी होतील.
2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा (19 फेब्रुवारी) पासून सुरू होईल, तर स्पर्धेचा फायनल सामना (9 मार्च) खेळला जाईल. या स्पर्धेसाठी, 8 संघांना 2 गटांमध्ये विभागण्यात आले आहे, ज्यामध्ये गट-अ आणि गट-ब चा समावेश आहे. भारताला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये ठेवण्यात आलं आहे. भारत (20 फेब्रुवारी) रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरूवात करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महान सचिन तेंडुलकर झाला ‘या’ खेळाडूचा चाहता..! म्हणाला…
भारतीय संघात पुनरागमन करणार करुण नायर? म्हणाला, “माझी निवड होईपर्यंत…”
“अशाप्रकारे संघाच्या बातम्या लीक होणं थांबेल”, आकाश चोप्रानं सांगितला रामबाण उपाय