टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विजय मिळून अंतिम सामन्यात प्रवेश करेल, अशा आशा भारतीयांना होत्या. मात्र, महिला एकेरी गटाच्या उपांत्य सामन्यात जगातील अव्वल मानांकित चीनी ताईपेच्या ताय झू-यिंगने सिंधूला २१- १८, २१-१२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे ती सुवर्ण आणि रौप्य पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. आता ती चीनच्या हे बिंग जियाओविरुद्ध कांस्य पदक मिळवण्यासाठी रविवारी (१ ऑगस्ट) भिडणार आहे.
पहिल्या सेटपासूनच सिंधू आणि ताय झूमध्ये कडाक्याची टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला सिंधूने १२-१० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र ताय झूने जबरदस्त प्रदर्शन करत हा सेट २१- १८ ने जिंकला. (PV Sindhu Beats Chinese Taipei Tai Tzu-ying In Womens Singles Semi Final)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Badminton
Women's Singles Semifinals ResultsA 💔 loss as @Pvsindhu1 goes down against World No. 1 Tai Tzu Ying 0-2. Keep you heads up champ, you have made us mighty proud! #StrongerTogether #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/9gtAJeXHnn
— Team India (@WeAreTeamIndia) July 31, 2021
पहिला सेट पराभूत झाल्यानंतर सिंधू दुसऱ्या सेटमध्येही पिछाडीवर होती. ती दुसऱ्या सेटमध्ये ७-११ ने मागे होती. ताय झू यिंगने सिंधूला चुका करण्यासाठी प्रवृत्त केले. पहिल्या सेटमध्ये मिळालेल्या पराभवाचा दबाव दुसऱ्या सेटमध्ये सिंधूवर दिसत होता. दुसऱ्या सेटमध्ये सिंधू २१- १२ ने पराभूत झाली.
रिओ ऑलिंपिक २०१६ मध्ये रौप्य पदक जिंकणारी सिंधू जगातील सातवी मानांकित आणि ऑलिंपिकमध्ये सहावी मानांकित खेळाडू आहे. दुसरीकडे ताय झू-यिंग जगातील अव्वल क्रमांकाची खेळाडू आहे. मात्र, तिला ऑलिंपिकमध्ये दुसरे मानांकन देण्यात आले आहे.
यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूने जपानच्या अकेन यामागुचीला २१-१३, २२-२० अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. हा सामना एकूण ५६ मिनिटे चालला होता. या ऑलिंपिकमध्ये सिंधू एकही सामन्यात पराभूत झाली नव्हती.
विशेष म्हणजे मागील वर्षी झालेल्या बीडब्ल्यू वर्ल्ड टूरच्या अंतिम फेरीत ताय झूकडून सिंधूला २१-१९, १२- २१, १७-२१ असा पराभव स्वीकारावा लागला होता.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक
-लंडन ऑलिंपिक मेडलिस्टकडून अतनू दास पराभूत; तिरंदाजीतील भारताचे आव्हान संपुष्टात