साल २०२१ आता अखेरच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे वर्षाचा आढावा अनेक जण घेत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा आढावा घ्यायचा झाल्यास भारताने अनेक मोठे विजय मिळवले, मात्र त्याचबरोबर भारतीय संघाचा मोठा पराभव टी२० विश्वचषक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (World Test Championship) यांच्यामध्ये मिळाला.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकाच्या (T20 World Cup) उपांत्य फेरीत सुद्धा भारत पोहचू नाही शकला. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World Test Championship) अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. याव्यतिरिक्त भारतीय संघाने काही विक्रम केले, तर जाणून घेऊया भारतीय संघाच्या आणि खेळाडूंच्या २०२१ मधल्या अश्या ५ विक्रमांबद्दल
ऑस्ट्रेलियामध्ये २ कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ
यावर्षी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून सर्वांना चकित केलं होतं. जानेवारीत भारताने ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये हरवून कसोटी मालिका जिंकली. याआधी भारताने २०१८-१९ मध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये २ वेळा मालिका जिंकणारा भारतीय संघ पहिला आशियाई संघ होता.
अश्विनने मोडला हरभजनचा विक्रम
रविचंद्रन अश्विन याने (Ravinchandran Ashwin) कसोटीमध्ये हरभजन सिंगला (Harbhajan Singh) सुद्धा मागे टाकलं. हरभजनने कसोटीमध्ये ४१७ विकेट्स घेतल्या होत्या. अश्विनने आता ४२९ विकेट्स घेतल्या आहेत. यामुळेच अश्विन आता भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा फिरकीपटू बनला आहे. या यादीत अनिल कुंबळे (Anil Kumble) अव्वल स्थानावर आहे. अनिल कुंबळेच्या कसोटीमध्ये ६१९ विकेट्स आहेत.
अक्षर पटेलने रचला इतिहास
भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने (Axar Patel) पहिल्या ५ कसोटी सामन्यात ५ विकेट हॉलचा विक्रम केला आहे. त्याने नरेंद्र हिरवानी (Narendra Hirwani) आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांचा विक्रम मोडला आहे.
रोहित शर्माच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५०+ धावा
रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-२० आंतरराष्ट्रीय सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. रोहितने ३० वेळा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० धावांचा टप्पा पार केला. यावेळी रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकत हा विक्रम केला. विराट कोहलीने (Virat Kohli) टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ अर्धशतकं केली आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये कोहलीने गाठला १०००० धावांचा टप्पा
यावर्षी कोहलीने टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला. आयपीएल दरम्यान विराट कोहलीने (Virat Kohli) १०००० धावांचा टप्पा गाठला. विराट कोहली टी२० क्रिकेटमध्ये १०००० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका क्रिकेटला गालबोट, डिविलियर्स, स्मिथसारख्या दिग्गज खेळाडूंवर गंभीर आरोप
दुसऱ्या ऍशेस कसोटीत वॉर्नर, स्टोक्स, अँडरसन रचू शकतात इतिहास, ‘या’ मोठ्या विक्रमांची होणार नोंद
रोहितच्या दुखापतीनंतर कसोटीच्या उपकर्णधारपदाबाबत निर्माण झाला तेढ, ‘हे’ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार