---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर; रोहित बाहेर, राहुल कर्णधार तर बुमराह उपकर्णधार

rohit rahul
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भाग घ्यायचा आहे. या मालिकेसाठी निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. दुखापतीमुळे संघाच्या बाहेर असलेला नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत सहभागी होणार नाही. त्याच्याऐवजी केएल राहुल संघाचे नेतृत्व सांभाळेल. राहुल प्रथमच संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचे उपकर्णधारपद सांभाळेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---