India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जाईल. मँचेस्टरमध्ये खेळला गेलेला चौथा कसोटी सामना ड्रॉ झाल्यामुळे, मालिकेत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाला जर पराभव टाळायचा असेल, तर कोणत्याही परिस्थितीत फायनल सामना जिंकावाच लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्वतः सोशल मीडियावर भारतीय संघ लंडन विमानतळावर उतरल्याचे फोटो शेअर केले आहेत. (Team India London arrival)
शुबमन गिल, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासह अनेक खेळाडू काळ्या स्टायलिश चष्म्यात दिसले. तर मोहम्मद सिराज कानावर हेडफोन लावून दिसला. विशेष म्हणजे, भारताच्या या युवा संघाने मँचेस्टरमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची अशी धुलाई केली की, दुसऱ्या डावात भारताच्या 3 फलंदाजांनी शतके झळकावून सामना ड्रॉ केला होता. (Manchester Test draw)
— BCCI (@BCCI) July 28, 2025
— BCCI (@BCCI) July 28, 2025
Manchester ✅
— BCCI (@BCCI) July 28, 2025
Hello London 👋#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/OPsWZIhXjZ
पाचवा आणि मालिकेतील फायनल कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत 15 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 2 वेळा त्यांना विजय मिळाला आहे. येथे भारतीय संघाचा पहिला विजय 1971 मध्ये अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली आला होता. तर, केनिंग्टन ओव्हलवर भारताने दुसरा विजय 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 157 धावांनी पराभूत केले होते. या मैदानावर भारताला 6 वेळा पराभव पत्करावा लागला आहे, 2 विजय मिळाले आहेत आणि उर्वरित 7 सामने ड्रॉ राहिले आहेत. (India’s Oval record)






