लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान दिले आहे. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा (६ सप्टेंबर) खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने एकही गडी गमावला नाही.
दरम्यान भारतीय गोलंदाज गडी बाद करण्यास अपयशी ठरले आहेत. ज्यामुळे चाहत्यांना आता आर अश्विनची आठवण येऊ लागली आहे. दरम्यान आर अश्विनला संधी न दिल्यामुळे भारतीय संघ व्ययस्थापक आणि कर्णधार कोहलीवर ही जोरदार टीका केली जाऊ लागली आहे.
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने गेली अनेक वर्ष भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या चार सामन्यात त्याला बाकावर बसावे लागले आहे. ज्यामुळे चाहत्यांनी विराट कोहली वर जोरदार टीका केली आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी ओव्हलवर फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीतून मदत मिळत असते. परंतु, रवींद्र जडेजा या खेळपट्टीवर साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.
दरम्यान इंग्लडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांचे म्हणणे आहे की, “अश्विन जर या सामन्यात खेळत असता,तर इंग्लंड संघाचा पराभव निश्चित होता. परंतु, अजूनही दोन्ही संघांना विजय मिळवण्याची समान संधी आहे.” या सामन्यात ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे.तसेच अश्विनला संधी न मिळाल्यामुळे चाहत्यांनी ही सोशल मीडियावर ट्विट करत निराशा व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले की,”३२ षटक ७७ धवन आणि एकही गडी बाद नाही.. भारताला अश्विनची गरज आहे…”
Yes the Chennai crowd is knowledgeable. But here’s The Oval crowd being very knowledgeable about Chennai’s R Ashwin & his figures in the second innings of his last game at this venue #EngvIND pic.twitter.com/rd1fPfzyBw
— Bharat Sundaresan (@beastieboy07) September 5, 2021
What a Test match .. Genuine chance for both teams to win .. If Ashwin was playing England would have no chance .. Without they certainly have a chance .. What a GREAT test series this has been .. !! #ENGvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) September 5, 2021
What a disgrace. One of the best players in the last decade is being ruined. #Ashwin #INDvENG pic.twitter.com/XfVxjKVtoB
— Jay 🇮🇳 (Modi ka pariwar) மோடியின் குடும்பம். (@JayMUFC04) September 5, 2021
https://twitter.com/tharunofficial_/status/1434568717652815886?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1434568717652815886%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-india-vs-england-4th-test-match-ind-vs-eng-r-ashwin-virat-kohli-the-oval-england-2nd-inning-4523166.html
32 Overs 77 Runs & No Wicket !!!
India missing this man soo badly 😢 pic.twitter.com/8oDVx5QgIb
— Varad Ralegaonkar (@varadr_tistic) September 5, 2021
भारतीय संघात एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. तर या संघात ४ वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत ४६६ धावांचा डोंगर उभारला होता. तर इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मायकल वॉनने पुन्हा तमाम भारतीयांच्या जखमेवर चोळले मीठ; अश्विनशी निगडित केले असे ट्विट
‘भारत आर्मी’चा इंग्लडमध्ये जल्लोष, विराटसाठी खास डान्स, व्हिडिओ व्हायरल