टोकियो ऑलिंपिकमधील चौथ्या दिवसाला (२६ जुलै) सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतासाठी सकाळी पार पडलेल्या तिरंदाजीमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय पुरुष तिरंदाजी संघाने आपल्या दमदार कामगिरीने कझाखस्तानचा धुव्वा उडवला आहे.
या पहिल्या राऊंडमध्ये भारतीय संघातील अतनू दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय यांनी कझाखस्तानला ६-२ ने मात दिली आहे. यासह त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. (Indian Team Beat Kazakhstan 6-2 in 1st Round of Men’s Team Event)
Archery:
Indian team of Atanu Das, Pravin Jadhav & Tarundeep Rai beat Kazakhstan 6-2 in 1st round of Men's Team event.
Next India will take on WR 6 South Korea at 1015 hrs IST. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/18GEmLilWo— India_AllSports (@India_AllSports) July 26, 2021
आता पुढील फेरीत भारतीय संघ जागतिक क्रमवारीतील ६ व्या क्रमांकाच्या दक्षिण कोरियाशी भिडणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ