---Advertisement---

एकेकाळी सूर्यकुमारने घेतला होता विराटशी पंगा, आता त्याच्याच नेतृत्त्वाखाली खेळणार टी२० क्रिकेट

On: सोमवार, फेब्रुवारी 22, 2021 11:27 AM
---Advertisement---

मागील कित्येक वर्षांपासून भारतीय संघाचे दार ठोठावणाऱ्या सूर्यकुमार यादवची तपश्चर्या अखेर फळाला आली आहे. १२ मार्चपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे लवकरच सूर्यकुमार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसणार आहे. यामुळे एका नव्या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

विराट आणि सूर्यकुमार हे दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) भाग आहेत. सूर्यकुमार आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख फलंदाज आहे. तर विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार आहे. संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएल २०२० दरम्यान त्या दोघांमध्ये खुन्नस पाहायला मिळाली होती.

त्याचे झाले होते असे की, २८ ऑक्टोबर २०२० रोजी अबु धाबीमध्ये मुंबई आणि बेंगलोर संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराटच्या बेंगलोर संघाने १६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचे फलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत. परंतु सूर्यकुमारने एकाकी झुंज देत ४३ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या होत्या. यासह मुंबईने ५ चेंडू राखून ५ विकेट्सने तो सामना जिंकला होता.

यादरम्यान विराटने सूर्यकुमारचा एका शॉटवर चेंडू पकडत त्याला झेलबाद करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. यानंतर विराटने रागाने सूर्यकुमारकडे पाहिले. मग सूर्यकुमारही माघार न घेता डोळे विस्फारून विराटला एकटक पाहू लागला. पुढे विराट त्याच्याजवळ आला, परंतु काहीही न बोलता माघारी निघून गेला. त्यावेळी त्यांच्यातील या वादाची जोरदार चर्चा झाली होती.

अशात आता सूर्यकुमार आणि विराट एकाच संघाकडून खेळणार असल्याने पुन्हा त्या प्रकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यांच्यातील वादाचे पडसाद मैदानावर दिसून येतील का? विराट या प्रकरणाचा सबब लावत प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमारला संधी देईल का नाही? अशा प्रश्नांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. परंतु आयपीएल सामन्यातील विवाद बाजूला ठेवत विराट भारतीय संघाच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेईल, हे निश्चित आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“मला नाही वाटत अश्विनचे वनडे आणि टी२० संघात पुनरागमन होईल,” गावसकरांचे मोठे भाष्य

“अनुष्का माझा आधारस्तंभ आहे, ती सदैव माझ्या पाठीशी…,” कोहलीने केलं बायकोचं तोंडभरुन कौतुक

भारत का इंग्लंड, अहमदाबाद कसोटीत कोणाचे पारडे जड? इंग्लिश दिग्गजाने सांगितले नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---