---Advertisement---

गिलची खेळी सोनेरी ठरली, टीम इंडियाने आयसीसी वनडे स्पर्धेत नवा मैलाचा टप्पा गाठला!

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025 9:45 AM
---Advertisement---

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. या सामन्यात, प्रथम भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. बांग्लादेशला 228 धावांवर रोखले. त्यानंतर, शुबमन गिलने नाबाद 101 धावांची खेळी करत भारतीय संघाला 46.3 षटकांत लक्ष्य गाठण्यास आणि पॉइंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडण्यास मदत केली. भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिलने त्याच्या उत्कृष्ट फॉर्मचा फायदा घेत या सामन्यात त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 8 वे शतक झळकावले, जे खूप खास ठरले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, टीम इंडियाच्या फलंदाजांनी आतापर्यंत आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. गेल्या 10 वर्षात झालेल्या स्पर्धांची आकडेवारी देखील याची साक्ष देते. शुबमन गिलने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांग्लादेशविरुद्ध शतक झळकावले. आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत टीम इंडियाचे हे आतापर्यंतचे 50 वे शतक होते. भारतीय संघ हा आकडा गाठणारा पहिला संघ ठरला आहे. आयसीसी एकदिवसीय सामन्यांमध्ये 42 शतकांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये या संघांनी सर्वाधिक शतके केली आहेत

भारत – 50 शतके
ऑस्ट्रेलिया – 42 शतके
श्रीलंका – 35 शतके
दक्षिण आफ्रिका – 30 शतके

बांग्लादेशविरुद्धच्या नाबाद 101 धावांच्या खेळीसाठी शुबमन गिलला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्याच्या शतकाबद्दल गिल म्हणाला की, हे त्याच्यासाठी खूप खास शतक आहे. कारण आयसीसी स्पर्धेत हे त्याचे पहिलेच शतक आहे. मी माझ्या खेळीबद्दल खूप खूश आहे. या खेळपट्टीवर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूंवर शॉट्स खेळणे सोपे नव्हते. म्हणूनच मी माझ्या पायांचा वापर करून 30 यार्ड सर्कलच्या वरती शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी आमच्यावर थोडा दबाव होता पण नंतर मला शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा संदेश मिळाला आणि मीही तेच करण्याचा प्रयत्न केला. ज्यात मी पूर्णपणे यशस्वी झालो.

हेही वाचा-

गिलने उलगडले त्याच्या संथ खेळीचे रहस्य, ड्रेसिंग रूममधून आलेला खास संदेश!
‘मी त्याला उद्या जेवायला…’, अक्षर पटेलच्या हुकलेल्या हॅट्ट्रीकवर रोहित काय म्हणाला?
या प्रकारे टीम इंडिया सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार, जाणून घ्या समीकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---