---Advertisement---

U19 Asia Cup 2023 । अर्शीन कुलकर्णी ठरला मॅच विनर, पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानला चारली धूळ

On: शुक्रवार, डिसेंबर 8, 2023 6:56 PM
Arshin Kulkarni
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तानचे 19 वर्षांखालील संघ शुक्रवारी (8 डिसेंबर) आमने सामने होते. दुबईच्या आयसीसी अकादमीमध्ये 19 वर्षांखालील आशिया चषकाची सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारताने अफगाणिस्तानला 7 विकेट्सने मात दिली. अर्शीन कुलकर्णी याने सलामीवीर म्हणून खेळताना भारतासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली. मुशीर खान यानेही महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले.

भारताच्या 19 वर्षांखील पुरुष संघाचे नेतृत्व उदय सहारन याच्याकडे सोपवले गेले आहे. उदयने नाणेफेक जिंकून प्रतम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 20 षटकांमध्ये 173 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर जमशीद झदरान याने 43 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्यानंतर मात्र अफगाणिस्तानचा एकही फलंदाज 30 धावांपर्यंत मजल मारू शकला नाही. संगातील तीन फलंदाज शुन्यावर बाद झाले. भारतासाठी राज लिंबानी आणि अर्शीन कुलकर्णी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या. नमन तिवारी याने दोन, तर मरुगन अभिषेक आणि आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरात भारतासाठी सलामीवीर अर्शीन कुलकर्णी याने 70*, तर मुशीर खान याने 40* धावांची मॅच विनिंग खेळी केली. सलामीवीर आदर्श सिंग अवघ्या 14 धावा करून बाद झाला. सुद्र पाटील आणि उदय सहारनयाने 20 धावा करून विकेट्स गमावल्या. अफगाणिस्तानसाठी बशीर अहमद, वाहिदुल्लाह झादरान आणि खालील अहमद यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. (Indian team defeated Afghanistan by 7 wickets in U19 Asia Cup )

महत्वाच्या बातम्या – 
‘हा संघ वनडेपेक्षा टी20त चांगला…’, बलाढ्य संघाच्या स्टार खेळाडूचे T20 World Cup 2024पूर्वी मोठे विधान
मुकेश कुमार लग्नानंतर दुसऱ्या इनिंगसाठी पूर्णपणे तयार, मजेशीर व्हिडिओ झाला व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---