---Advertisement---

मुकेश कुमार लग्नानंतर दुसऱ्या इनिंगसाठी पूर्णपणे तयार, मजेशीर व्हिडिओ झाला व्हायरल

On: शुक्रवार, डिसेंबर 8, 2023 4:53 PM
Mukesh Kumar 1
---Advertisement---

भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने नुकतेच लग्न केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेदरम्यान त्यानी लग्नगाठ बांधली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान विवाहबद्ध झालेला मुकेश कुमार पुन्हा संघात सामिल झाला आणि मालिकेतील शेवटचा सामना खेळला. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लग्नानंतरच्या दुसऱ्या इनिंगबद्दल बोलताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये मुकेश कुमार (Mukesh Kumar) मीडियाशी बोलताना दिसत आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना, भारतीय वेगवान गोलंदाज म्हणाला, “मला चांगले वाटत आहे आणि मी जिच्यासोबत सुरुवातीपासून होतो तिच्यासोबत मी दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे आणि पुढे मी तिच्यासोबत चांगला खेळ खेळेन.” असे म्हणताच मुकेशच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

पुढे, मुकेश दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तयारीबद्दल सांगिताना, म्हणाला, “त्यासाठी तयारी सुरू आहे. आमचे सर्व प्रशिक्षक बेंगलोरमध्ये भेटतील. आम्ही तिथून फ्लाइट घेऊ. दक्षिण आफ्रिकेत काहीही झाले तरी आम्ही रणनीती तयार करू. तिथली विकेट आणि खेळपट्टी बघेन.” हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यानचा आहे.

मुकेश कुमार दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही मालिकांमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी20) भारतीय संघाचा एक भाग आहे. मुकेश व्यतिरिक्त या यादीत ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचाही समावेश आहे, जे तिन्ही मालिकेत भारतीय संघाचा भाग आहेत.

मुकेशने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 1 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात 4 विकेट्स आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत. मुकेशने आतापर्यंत भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. (Mukesh Kumar fully ready for second innings after marriage funny video goes viral)

महत्वाच्या बातम्या

‘त्याने 20 किलो वजन कमी केले, तर मी त्याला…’, असगरने सांगितला धोनीसोबतचा Asia Cup 2018मधील मजेशीर किस्सा
‘कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाला धोका…’, श्रीलंकेन दिग्गजाच्या विधानाने वेधले क्रिकेटप्रेमींचे लक्ष, वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---