आयपीएल २०२२ चे साखळी फेरीतील सामने आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत. प्लेऑफमधील एक संघ देखील निश्चित झाला आहे. आता सात संघ आहेत, जे प्लेऑफमधील राहिलेल्या ३ जागांसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. अशातच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रीय संघाच्या निवडकर्त्यांची भेट घेणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच घोषित होऊ शकतो.
आयपीएलनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या या देशात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमिवर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाच्या निवडकर्त्यांसोबत बैठकीत सहभागी होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माध्यामांतील वृत्तानुसार, रोहित आणि निवडकर्त्यांमध्ये २३ मे रोजी मुंबईमध्ये बैठक पार पडू शकते. आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना याच दिवशी खेळला जाणार आहे. बैठकीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. हा संघ २६ मे रोजी घोषित केला जाऊ शकतो. दरम्यान, रोहित या बैठकीत काही नवीन खेळाडूंच्या नावाचा प्रस्ताव निवडकर्त्यांपुढे ठेवण्याचीही शक्यता आहे.
विराट कोहलीनंतर जेव्हापासून रोहित भारताचा कर्णधार बनला आहे, तेव्हापासून संघाने एकाही मालिकेत पराभव स्वीकारला नाहीये. यादरम्यान भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पराभूत झाला होता, पण रोहित स्वतः या दौऱ्यात सहभागी नव्हता. अशात मायदेशातील आगामी मालिकेत देखील संघाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ४ जून रोजी बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत हजर असेल आणि तिथून ते दिल्लीसाठी रवाना होतील.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. माहितीनुसार विराट कोहली, मोहम्मद शमी, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांना या मालिकेवेळी विश्रांती दिली जाणार आहे. रोहितला देखील आरम दिला जाऊ शकतो, पण त्याला संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. अशात त्याला आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळेल. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या किंवा शिखर धवन यांपैकी एकाकडे नेतृत्त्वाची धुरा सोपवली जाऊ शकते.
तर दुसरीकडे सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, दीपक चाहर हे दुखापतग्रस्त आहेत. टी नटराजन, वाशिंगटन सुंदर देखील दुखापतग्रस्त आहेत. याच कारणास्तव युवा खेळाडूंना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल मॅच फिक्सिंगच्या आरोपात सीबीआयकडून तिघांना अटक, पाकिस्तानशी आहे कनेक्शन!
पंजाबविरुद्धची मॅच गमावत आरसीबीच्या अपेक्षांना झटका, आता प्लेऑफमध्ये कसा पोहोचणार फाफचा संघ?