---Advertisement---

टीम इंडियाचा ‘डबलवार’, झिम्बाब्वेला हरवत पाकिस्तानच्या ३२ वर्षे जुन्या विश्वविक्रमाला तडा

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 12:34 PM
Team-India-Azam-Pakistan
---Advertisement---

केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेला दुसऱ्या वनडे सामन्यात ५ विकेट्सने हरवले आहे. हा सामना जिंकत भारतीय संघाने ३ सामन्यांची वनडे मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली आहे. हा सामना विजय भारतीय संघासाठी अतिशय खास राहिला आहे. कारण हा सामना जिंकत भारतीय संघाने कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघाचा विश्वविक्रम मोडित काढला आहे. भारतीय संघ एकाच मैदानावर सर्वाधिक सलग वनडे सामने जिंकणारा जगातील पहिला संघ बनला आहे. 

हरारे (Harare) येथे शनिवारी (२० ऑगस्ट) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात (Second ODI) झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी करताना ३८.१ षटकात १६१ धावांवरच सर्वबाद झाला. झिम्बाब्वेकडून (Zimbabwe vs India) या डावात सिन विलियम्स याने सर्वाधिक ४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २५.४ षटकातच झिम्बाब्वेचे आव्हान पूर्ण केले. संजू सॅमसनच्या नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने झिम्बाब्वेवर एकतर्फी विजय मिळवला. संजूव्यतिरिक्त (Sanju Samson) शिखर धवन आणि शुबमन गिल यांनीही ३३ धावा केल्या.

हा सामना जिंकत भारतीय संघाने दीर्घ काळापासून पाकिस्तानच्या नावावर असलेला एक मोठा विक्रम मोडला आहे. भारतीय संघाचा हा हरारेच्या मैदानावरील सलग ११ वा विजय होता. या विजयासह भारतीय संघाने एकाच मैदानावर (Most Consecutive Win At Same Ground) सर्वाधिक सलग ११ वनडे सामने जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. हरारेत भारतीय संघाच्या विजयाची साखळी २०१३ मध्ये सुरू झाली होती, जी आताही सुरूच आहे. भारतीय संघाने २०१३ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली झिम्बाब्वेला हरारेत ३-० ने वनडे मालिकेत पराभूत केले होते.

दुसरीकडे पाकिस्तान संघाने १९९० मध्ये शारजाहच्या एका मैदानावर सलग १० वनडे सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. मात्र आता भारतीय संघाने पाकिस्तानचा हा ३२ वर्षे जुना विक्रम मोडित काढला आहे. तसेच या विक्रमाच्या यादीत वेस्ट इंडिजचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी १९९२ ते २०११ मध्ये एकाच मैदानावर सलग ९ वनडे सामने जिंकले होते.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO। ‘बाबर आझम म्हणजे क्रिकेटमधला मेस्सी अन् रोनाल्डो’, पाकिस्तानी अष्टपैलू बरळला
आता काय म्हणावे? मोठे मनाने ज्याला ऑटोग्राफ दिला, त्याच चाहत्याने चोरलं खेळाडूचं ५६ लाखांचं घड्याळ
शुबमन गिलची लॉटरी! न्यूझीलंडविरुद्ध भूषवणार भारताचे नेतृत्त्वपद, विराटचा जोडीदारही खेळणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---