---Advertisement---

टीम इंडियाच्या खेळाडूंना पुढील एक महिन्यासाठी रहावे लागणार पत्नीपासून दूर?

On: सोमवार, जुलै 23, 2018 4:54 PM
---Advertisement---

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिका संपल्या आहेत. तसेच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 1 आॅगस्ट पासून सुरु होणार आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना काही दिवसांची विश्रांती मिळाली आहे.

या वेळात खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणे पंसंत केले. पण आता खेळाडूंना पहिल्या तीन कसोटी सामन्यांदरम्यान म्हणजे पुढील एक महिनातरी त्यांची पत्नी किंवा प्रेयसी यांच्यापासून दूर रहावे लागणार आहे.

याबद्दल मिररने दिलेल्या वृत्ताप्रमाणे संघाच्या सुत्राने सांगितले की, ‘पुढे असणाऱ्या महत्त्वाच्या मालिकेआधी आम्हाला चार दिवस विश्रांती मिळाली आहे. खेळाडू त्यांची पत्नी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांसह फिरायला गेले होते. पण उद्या आम्ही क्लेम्सफोर्डकडे रवाना होत आहोत.’

मागील काही दिवसांपासून खेळाडूंच्या खराब कामगिरीसाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टीका होत आहे. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या पत्नी किंवा प्रेयसी यांच्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय संघव्यवस्थावनाने घेतला आहे.

तसेच इंग्लंड आणि भारत यांच्यात होणारी कसोटी मालिका महत्त्वाची असल्याने संघ व्यवस्थापनेने कदाचीत हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

भारताची या दौऱ्यात संमिश्र कामगिरी झाली आहे. भारताने टी20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवला तर वनडे मालिकेत भारताला 2-1 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मागील काही वर्षांपासून भारतीय खेळाडूंना त्यांच्या पत्नीला सोबत करण्याची परवानगी देण्यात आली होती.

भारतीय संघ या कसोटी मालिकेत 5 सामने खेळणार असून बुधवारी (18 जुलै) पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

इशांत शर्माने दाखवला आपल्या गोलंदाजांवर ठाम विश्वास

स्म्रीती मानधनाचे किया सुपर लीगमध्ये धमाकेदार आगमन

एमएस धोनीची फॅमीली मेंबर करत आहे मुंबई इंडियन्ससाठी चिअर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment