भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघाच्या सपोर्ट स्टाफमधील गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांचा कार्यकाळ आगामी टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. मागच्या काही दिवसांपासून रवी शास्त्रींनंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार याबाबत चर्चा केल्या जात आहेत. अशात बीसीसीआयला भारतीय संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ गरजेचा असणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, बीसीसीआय संघासाठी मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा शोध लवकरच सुरू करणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी जाहीरात या आठवड्यात प्रसारित केली जाऊ शकते.
भारतीय संघासाठी नवीन प्रशिक्षकांच्या निवडीबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सशी चर्चा केली. ते यावेळी म्हणाले की, “न्यूझीलंड मालिकेआधी आपल्याकडे नवीन प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ असतील. यासाठी या आठवड्याच्या शेवटी आम्ही जाहिरात प्रसारीत करू शकतो.”
न्यूझीलंडविरुद्ध भारताची मायदेशातील मालिका १७ नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहेत. म्हणजेच टी २० विश्वचषकाचा अंतिम सामना संपल्यानंतर तीन दिवसांनी ही मालिका खेळली जाईल.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अनेकांची नावे समोर आली आहेत. या यादीत भारतीय दिग्गज राहुल द्रविड, वीवीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळेचंही नाव आहे. राहुल द्रविडच्या नावाला सर्वाची सहमती असली, तरी तो स्वत: ही जबाबदारी घेण्यासाठी इच्छुक नसल्याची चर्चा होत आहे.
भारतातील या दिग्गजांव्यतिरिक्त विदेशातील काही दिग्गजांचीही नावे या शर्यतीत आहेत. नुकतेच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. टॉम मूडी यावेळी आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादचे क्रिकेट डायरेक्टर आहेत. तसेच ते श्रीलंकन संघाचेही क्रिकेट डायरेक्टर आहेत. टॉम मूडी व्यतिरिक्त या पदासाठी श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धने याचेही नाव चर्चेत आले होते, पण तो यासाठी इच्छुक दिसला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
राष्ट्र प्रथम! टी२० विश्वचषकात टीम इंडियाच्या मेंटाॅरशीपचा धोनी घेणार नाही एकही रुपया
पालथ्या घड्यावर पाणी! सलग दुसऱ्या वर्षी बेंगलोर एलिमिनेटरमध्ये पराभूत; नावावर ‘हा’ नकोसा विक्रम