भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (South Africa vs India) नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यावर झालेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता, तर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने ३-० ने बाजी मारली होती. या दौऱ्यावर भारतीय संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. दरम्यान, आगामी विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाची कमजोर बाजू जगासमोर आली आहे.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१९ स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. परंतु, या सामन्यात भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे भारतीय संघाला तो सामना गमवावा लागला होता.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर समोर आली भारतीय संघाची कमजोर बाजू
आयसीसी २०१९ विश्वचषक स्पर्धेत देखील चौथ्या क्रमांकावर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अनेक फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली गेली होती. परंतु, कुठल्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नव्हती.
आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघाला श्रेयस अय्यरसारखा (Shreyas Iyer) फलंदाज मिळाला होता, जो सातत्याने चांगली कामगिरी करत होता. परंतु, हा फलंदाज देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाला मध्यक्रमातील फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.
अधिक वाचा – बवुमाने उडवली भारतीय संघाची खिल्ली; खोचक शब्दांत दाखवला आरसा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत रिषभ पंतला (Rishabh pant) चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती. त्याने पहिल्या सामन्यात १६, दुसऱ्या सामन्यात ८५ आणि तिसऱ्या सामन्यात खाते ही उघडले नव्हते. तर पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. त्याने १७, ११ आणि २६ धावा केल्या होत्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वेंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) पहिल्या सामन्यात २ आणि दुसऱ्या सामन्यात २२ धावा करण्यात यश आले होते.
व्हिडिओ पाहा – नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?
तसेच भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचे म्हणणे आहे की, भारतीय संघाने मधली फळी मजबूत करण्याचा विचार केला पाहिजे. कारण याच वर्षी आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा आहे. तसेच पुढच्या वर्षी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा आहे. तसेच हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूरसारख्या खेळाडूंना घेऊन पुढे गेलं पाहिजे. असे आकाश चोप्राचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या :
राहुल खरोखरच तुम्हाला कर्णधार वाटतो का? बीसीसीआय अधिकाऱ्याचा पत्रकाराला प्रतिप्रश्न
सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानंतर आली आफ्रिदीची प्रतिक्रिया; म्हणाला,” केएल राहुलला…”
हे नक्की पाहा: