---Advertisement---

INDvsSA: संजू सॅमसनची क्रेझ, टीम इंडिया तिरुवनंतपुरमला पोहोचताच चाहत्यांच्या शॉकिंग रिऍक्शन

Sanju-Samson
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशी जिंकल्यावर भारतीय संघ सोमवारी (26 सप्टेंबर) तिरुवनंतपुरमला पोहोचला आहे. येथे यजमान संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी20 सामना खेळणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुवनंतपुरममध्ये खेळला जाणार आहे. तिरुवनंतपुरममध्ये पोहोचताच विमानतळाच्या बाहेर भारताच्या हजारो चाहत्यांनी संघाचे जोरदार स्वागत केले. तेव्हा संजू संजूचा नारा दिला जात होता. काही भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर संजू अर्थातच संजू सॅमसनला टॅग करत स्टोरी शेयर केली आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली आहे.

तिरुवनंतपुरममध्ये पोहोचताच भारतीय संघ मंगळवारी (27 सप्टेंबर) सराव अभ्यास करणार आहे. भारतीय खेळाडूंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते विमानतळावर उपस्थित होते. यावेळी हे चाहते स्थानिक स्टार क्रिकेटपटू आणि भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नावाने ओरडा देत असल्याने संपूर्ण परिसर त्याच्या नावाने दुमदुमला होता.

सॅमसनला टी20 विश्वचषक 2022साठी भारतीय संघातून वगळले. तसेच त्याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतही संघात जागा मिळाली नाही. त्याला भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच्या फारच कमी संधी मिळतात. सध्या तो न्यूझीलंड ए विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी इंडिया ए चा कर्णधार आहे. 27 वर्षाच्या या खेळाडूने भारताकडून 7 वनडे आणि 16 टी20 सामने खेळले आहेत.

Photo Courtesy: insta/ rashwin99

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी20 सामन्यांची 75% तिकिटे विकली गेली आहेत. याची किंमत किमान 1500 रुपये आहे. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ- 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रेयस करणार टीम इंडियात कमबॅक? प्रमुख अष्टपैलू झाला दुखापतग्रस्त
INDvsAUS: काय सांगता, मालिका निर्णायक सामन्याआधी ‘मॅचविनर’ सूर्या होता अनफिट! स्वत:च केला खुलासा
धक्कादायक! तानिया भाटियाच्या हॉटेल रुममधून खासगी साहित्याची चोरी; लंडनमध्ये घडली घटना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---