भारताने हैद्राबाद येथे खेळल्या गेलेल्या मालिका निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाला (INDvsAUS) 6 विकेट्सने पराभूत केले आहे. यामुळे भारताने तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1ने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 186 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी अर्धशतके केली. यामुळे भारताने 1 चेंडू शिल्लक राखत सामना जिंकला. भारताच्या या रोमांचक विजयाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ज्याप्रकारे सेलेब्रेशन केले आहे, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने 19व्या षटकाच्या 5व्या यॉर्करवर चौकार लगावला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी रोहितने विराटची गळाभेटही घेतली. त्याआधी विराट शेवटच्याच षटकात षटकार मारून बाद झाल्याने तो पॅडही न काढता रोहितच्या शेजारी बसला. या सामन्यात पुन्हा एकदा विराटचे चेज मास्टरचे रूप दिसले. त्याने 48 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत 63 धावा केल्या.
Virat Kohli and Rohit Sharma, divided by fans united by passion and love towards country and TEAM INDIA ????????#INDvAUS #SuryakumarYadav #KingKohli #HardikPandya pic.twitter.com/JJEj2XF09N
— Anshul Talmale (@TalmaleAnshul) September 25, 2022
विराट 63 धावांची खेळी करत तंबूत परतला तेव्हा रोहितने त्याची पाठ थोपटली. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी20तील 33वे अर्धशतक ठरले आहे. या प्रकारामध्ये त्याने 3660 धावाही पूर्ण केल्या आहेत. यामुळे तो आंंतरराष्ट्रीय टी20मध्ये रोहितपासून 34 धावा मागे आहे. रोहित आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याने 3694 धावा केल्या आहेत.
Rohit Sharma gave a pat on Virat Kohli's back for his knock. pic.twitter.com/ft7TIsqLOF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 25, 2022
विराट आशिया चषक 2022पासून चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याची मागील 8 टी20 सामन्यांमध्ये 58.6च्या सरासरी आणि 141.9 स्ट्राईक रेट राहिला आहे. टी20 विश्वचषक 2022 पूर्वी भारताच्या या अनुभवी फलंदाजाचा फॉर्म परतल्याने चाहत्यांच्या आणि भारतीय संघामध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण असेल.
आठवा पूरूष टी20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना 28 सप्टेंबरला तिरूअनंतपूरम येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमी यावेळीही संघाबाहेर! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उमरान मलिकची टिम इंडियात लागणार वर्णी
छत्तीसगड इंटरनॅशनल चॅलेंजमध्ये तसनीम आणि प्रियांशूने एकेरीचे विजेतेपद पटकावले
ऑस्ट्रेलियानंतर भारत आता दक्षिण आफ्रिकेचा घाम काढणार! पाहा वेळापत्रक आणि हेड-टू-हेड रेकॉर्ड्स






