बुधवारी (२३ जून) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल लागला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला ८ विकेट्सने मात देत पहिल्या वहिल्या कसोटी अंजिक्यपदाच्या गदेवर नाव कोरले. या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असा तिन्ही विभागात मात केली. विशेष म्हणजे न्यूझीलंडने आयसीसीच्या स्पर्धेत भारतावर वर्चस्व गाजवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही न्यूझीलंड भारतासाठी आयसीसी स्पर्धेतील कठीण पेपर ठरला आहे.
या लेखात आपण १९९९ विश्वचषकापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी स्पर्धांमधील सामन्यांचा आढावा घेऊ.
१९९९ विश्वचषक
साल १९९९च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने भारतीय संघाला ‘सुपर सिक्स’ फेरीत पराभूत केले होते. न्यूझीलंड संघाने १० चेंडू ठेऊन भारतीय संघावर विजय मिळवला होता. भारतीय संघाने सामन्यात ५० षटकात २५१ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघाकडून मेट होर्नने ७४ आणि रॉजर ट्रोसने ६० धावा केल्या होत्या.
२००० आयसीसी नॉकआउट ट्रॉफी (चॅम्पियन्स ट्रॉफी)
भारतीय संघाने आयसीसी नॉकआउट स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाहिली फलंदाजी करताना ६ बाज २६४ इतकी धाव संख्या उभारली. भारतीय संघाकडून कर्णधार सौरव गांगुलीने ११७ धावा तर, सचिन तेंडुलकरने ६९ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये वेंकटेश प्रसादने २७ धावा देऊन ३ बळी टिपले. परंतु त्या व्यतिरिक्त बाकी कोणत्याही गोलंदाजाला प्रभावी मारा करता नाही. न्यूझीलंडच्या क्रिस क्रेन्सने सामन्यात शतक ठोकत भारतीय संघाचा पराभव केला आणि न्यूझीलंडला पहिले आयसीसी विजेतेपद मिळवून दिले.
२००३चा विश्व चषक
२००३मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळाला आहे. भारतीय संघाने हा सामना ७ गडी राखून जिंकला होता. या सामन्यात डावखुरा गोलंदाज झहीर खानाने ४ तर, हरभजन सिंगने २ गडी बाद केले होते.
२००७ आणि २०१६चा टी -२० विश्वचषक
भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघ आयसीसीच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत २ वेळा आमने सामने आले. एक २००७च्या टी२० विश्वचषकामध्ये आणि दुसऱ्यांदा २०१६ च्या टी२० विश्वचषकामध्ये. २००७ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने भारतीय संघाला १० धावांनी मात दिली. आणि २०१६च्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंडने ४७ धावांनी विजय मिळवला.
२०१९चा विश्वचषक
साल २०१९च्या विश्वचषकाती उपांत्य फेरीत भारतीय विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगला होता. पहिली फलंदाजी करून न्यूझीलंड संघाने २३९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ १८ धावांनी पराभूत झाला होता. हा सामना पावसामुळे राखीव दिवशी पूर्ण झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘टीम इंडिया क्रिकेट विश्वातील नवा चोकर’, चाहत्यांकडून सोशल मीडियावर कडाडून टीका; मीम्सही व्हायरल
ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरल्यानंतर रॉस टेलरला आनंदाश्रू अनावर, मुलाखतीतही खूप रडला