नुकतीच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील ५ सामन्यांची टी२० मालिका संपली आहे. या मालिकेनंतर लगेचच भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर जायचे आहे, जिथे उभय संघ २ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. या मालिकेसाठी आयर्लंडला जाणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना ३ दिवसांची विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर (India vs South Africa) प्रशिक्षक राहुल द्रविड, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत लगेचच इंग्लंडला रवाना झाले आहेत. परंतु टी२० स्पेशलिस्ट खेळाडूंना छोटासा ब्रेक मिळणे गरजेचे (Three Days Break) असल्याचे बीसीसीआयचे (BCCI) म्हणणे आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे की, “आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडल्या गेलेल्या सर्व खेळाडूंना आयर्लंडला रवाना होण्यापूर्वी ३ दिवसांची विश्रांती दिली जाणार आहे. या मालिकेसाठी कोणते बायो बबल असणार नाही. खेळाडूही त्यांच्या कुटुंबाविना या दौऱ्यावर जातील. काही खेळाडू आयपीएलपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कुटुंबासोबत काही वेळ घालवणे, योग्य असेल.”
तसेच आयर्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या १७ सदस्यीय संघातील सर्व खेळाडू २३ जून रोजी मुंबईत एकत्र जमतील. यावेळी संघासोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सहकारी स्टाफही मुंबईत संघासोबत जोडले जातील, असे समजत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, “लक्ष्मण आणि भारतीय संघातील खेळाडू २३ जूनला मुंबईत एकत्र जमतील आणि पुढील दिवशी ते डब्लीनला जाण्यासाठी रवाना होतील. भारतीय संंघातील अधिकतर खेळाडू नुकतीच टी२० मालिका खेळले आहेत, त्यामुळे त्यांना लयीत परतण्यासाठी जास्त वेळेची गरज नसेल.”
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
असे आहे भारत वि. आयर्लंड टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी२० सामना- २६ जून, डब्लीन
दुसरा टी२० सामना- २८ जून डब्लीन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नाणेफेकीच्या बाबतीत कर्णधार पंतला नाही मिळाली नशिबाची साथ, नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
विचारही केला नव्हता, ८ महिन्यांत ६ कर्णधारांसोबत काम करावे लागेल; द्रविडने सांगितला अनुभव






