संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा चालू होती. आता येत्या ऑस्ट्रेलिया दौर्यात खेळल्या जाणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी, ३ सामन्यांच्या वनडे आणि ३ सामन्यांच्या टी२० मालिकेकरीता भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र मर्यादित षटकांच्या संघाचा (वनडे आणि टी२०) उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही. तो दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या सहभागाबद्दल नंतर निर्णय घेतला जाईल.
रविवारी (१८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब दरम्यान झालेल्या आयपीएल २०२०च्या ३६व्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून अद्याप तरी रोहित आयपीएलमध्ये खेळताना दिसलेला नाही. संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.
“हे खूप दुर्दैवी आहे की रोहित आयपीएलमध्ये भाग घेणार नाही. तो भारतात परत जाणार असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काही दाखल होईल. तेथे तो दुखापतीतून सावरण्यासाठी काम करेल,” असे एका बीसीसीआय सुत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले.
“२०२१ विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा मर्यादीत षटकांचा विकेटकीपर म्हणून राहुलला पहिली पसंती असणार आहे.त्याने त्याच्या नेतृत्त्वगुणानेही सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याचमुळे त्याला संघाचा उपकर्णधार केले आहे, ” असे बीसीसीआय सुत्रांनी सांगितले.
बीसीसीआयने रोहितच्या दुखापतीचे कसलीही जोखीम न घेता, त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटसह कोणत्याच संघात स्थान दिलेले नाही. त्याच्याऐवजी केएल राहुलला भारतीय वनडे आणि टी२० संघांचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद. सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग.! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पाहा टी-२०, वनडे आणि कसोटी संघाची संपुर्ण यादी
-पुजारा, विहारी आणि शास्त्री लवकरच होणार युएईला रवाना, ‘हे’ आहे कारण
-अखेर सूर्यकुमार यादवची प्रतिक्षा संपली, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व?
ट्रेंडिंग लेख-
-IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
-अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती