भारतीय संघ यंदाच्या टी20 विश्वचषकासाठी सुपर-8 मध्ये पात्र ठरला आहे. टीम इंडिया अमेरिकाला 7 विकेट्सनी धूळ चारत सुपर-8 मध्ये क्वालिफाय झाली. आता टीम इंंडियाचे सुपर-8 मधील संभाव्य वेळापत्रक कसे असेल, हे जाणून घेणार आहोत. यंदाच्या विश्वचषकात 4 गट आहेत. आता 4 गटातील 4 संघ आतापर्यंत सुपर-8 साठी पात्र ठरले आहेत, पण प्रत्येक गटातील आणखी एक एक संघ पात्र ठरणार आहे. आता सुपर-8 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होणार असल्याची घोषणा झाली. पण त्यासोबतच टीम इंडिया वेस्ट इंडिज किंवा दक्षिण आफ्रिका सोबत सामना होणार नाही हे पण निश्चित आहे.
वास्तविक, आयसीसीने 8 मोठ्या संघाना सुपर-8 चे प्राधान्य दिले होते की, कोणते संघ कधी कधी कोणा विरुद्ध खेळणार. आयसीसीने विश्वचषकापूर्वी चारही गटातील दोन दोन संघाना नंबर(क्रमवारी) दिले होते, जसं की अ गटातील भारतास अ1 तर ब गटातील ब1 म्हणून इंग्लंड, क1 म्हणून न्यूझीलंड आणि ड1 दक्षिण आफ्रिकाला मानले जाईल. त्याच प्रमाणे अ2 म्हणून पाकिस्तान तर ब2 म्हणून ऑस्ट्रेलिया आणि क2 वेस्ट इंडिज तर ड2 श्रीलंकाला मानले जाईल. परंतू हे तेव्हा होईल जेव्हा संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील. जर यापैकी दुसरा संघ पात्र ठरला तर त्याजागी तो संघ बदलेल.
अश्या स्थितीत अ1 म्हणजे टीम इंडिया सुपर-8 मध्ये आपला पहिला सामना 20 जून रोजी तर दुसरा सामना 22 जून आणि सुपर-8 मधील अखेरचा सामना 24 जून रोजी खेळेल जो अंतीम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध असेल, या व्यतीरिक्त 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध सामना होण्याची शक्यता आहे, कारण क1 मध्ये न्यूझीलंड संघ पात्र ठरण्याची संभावना खूपच कमी आहे. तर 22 जून रोजी श्रीलंका ऐवजी बांग्लादेश किंवा नेंदरलँड विरुद्ध सामन्या होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाची सुपर-8 मधील संभाव्य वेळापत्रक
20 जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान बारर्बाडोस रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनूसार)
22 जून – भारत विरुद्ध बांग्लादेश किंवा नेंदरलँड अँटिग्वा रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनूसार)
24 जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया सेंट लूसिया रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनूसार)
महत्तवाच्या बातम्या-
फ्लोरिडातील पुढील तीनही सामने पावसामुळे वाहून जातील का? भारत विरुद्ध कॅनडा सामना होणार की नाही?
माणूस आहे की पक्षी! मोहम्मद सिराजने हवेत उडी मारत घेतला अविश्वसनीय झेल!
विश्वचषकातील सामने संपले, आता न्यूयॉर्कच्या तात्पुरत्या स्टेडियमचं काय होणार? अंबानींच्या नावाची चर्चा का?