---Advertisement---

पुण्याच्या मैदानावर भारताची टी20 मधील कामगिरी कशी? जाणून घ्या आकडेवारी

On: गुरूवार, जानेवारी 30, 2025 11:01 PM
India win
---Advertisement---

भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 3 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान दोन्ही संघातील चौथा टी20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिका आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करेल, तत्पूर्वी पुण्याच्या मैदानावरील भारतीय संघाचे रेकाॅर्ड्स टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे रेकाॅर्ड्स कसे आहेत. याबद्दल जाणून घेऊया.

भारतीय संघाने आतापर्यंत पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर एकूण 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या मैदानावर भारताचा विजय आणि पराभवाचा टक्का 50-50 आहे. भारताने 2 सामने जिंकले, तर 20 गमावले. दोन्ही विजय अनुक्रमे 2012 आणि 2020 मध्ये भारताला मिळाले. या मैदानावर भारताने शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये श्रीलंकेविरूद्ध खेळला होता, ज्यामध्ये त्यांना 16 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या मैदानावर भारताचा इंग्लंडशीही सामना झाला आहे.

या मैदानावर भारत आणि इंग्लंडचे संघ एकदा आमने-सामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. 2012 मध्ये, पुण्यात,भारताने इंग्लंडविरुद्ध पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. भारताने हा सामना महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली खेळला, ज्यामध्ये त्यांनी 5 विकेट्सने विजय मिळवला. या मैदानावर श्रीलंकेने भारताला 2 वेळा हरवले आहे. 2016 आणि 2023 मध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

एक रणजी सामना खेळण्यासाठी विराट कोहलीला किती पैसे मिळतात?
“खेळापेक्षा मोठा सुपरस्टार कोणी…” माजी दिग्गजाची भारतीय खेळाडूंवर साधला निशाणा
AUS vs SL; मिचेल स्टार्कने रचला इतिहास, 700 विकेट्स पूर्ण करत केला खास रेकाॅर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---