भारताची अनुभवी महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिने मंगळवारी (21 फेब्रुवारी) आपल्या टेनिस कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. दुबई टेनिस चॅम्पियनशिपच्या या सामन्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह तिच्या दोन दशकांच्या टेनिस कारकिर्दीची समाप्ती झाली.
A long embrace with Madison Keys and that is that for Sania Mirza's playing career. pic.twitter.com/xae2AVGloV
— Vinayakk (@vinayakkm) February 21, 2023
भारतीय महिला टेनिसची ओळख म्हणून सानियाकडे पाहिले जात होते. मागील वीस वर्षांपासून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत होती. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनसह तीने ग्रँडस्लॅममधून निवृत्ती जाहीर केलेली. दुबई येथील स्पर्धेनंतर आपण सर्व प्रकारच्या टेनिस मधून निवृत्त होणार असल्याचे तिने म्हटलेले. या स्पर्धेतील महिला दुहेरी प्रकारातील तिच्या पहिल्याच सामन्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. सानिया व तिची अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीज जोडीला वेरोनिका कुडरमेटोवा आणि ल्युडमिला सॅमसोनोव्हा यांच्याकडून 6-4, 6-4 असा पराभव पत्करावा लागला. यासह तिची कारकीर्द समाप्त झाली.
जूनियर विम्बल्डन जिंकल्यानंतर 2003 मध्ये सानिया सर्वात प्रथम चर्चेत आली होती. त्यानंतर भारताची सर्वोत्तम महिला टेनिसपटू म्हणून तिला ओळखले जाऊ लागले. 2013 मध्ये तिने एकेरीतून निवृत्ती घेत आपले पूर्ण लक्ष महिला दुहेरी व मिश्र दुहेरीवर केंद्रित केले. तिने आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जिंकण्याची कामगिरी केली. मागील महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्याही अंतिम सामने तिने रोहन बोपन्नासह धडक दिलेली. निवृत्तीनंतर आता सानिया वुमेन्स प्रिमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची मेंटर म्हणून काम पाहिल.
(Indian Tennis Star Sania Mirza Bid Adieu To All Forms Of Tennis)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिल नव्हेतर ‘हा’ फलंदाज वाटतो स्मिथला ‘फ्युचर सुपरस्टार’, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये
BREAKING: क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर मॉडेल सपना गिलकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल, सेल्फी प्रकरण चिघळले (mahasports.in)