प्रथमच आयोजित केलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (Womens Premier League) अर्थात महिला आयपीएलसाठीचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात देश विदेशातील अनेक महिला खेळाडूंवर मोठी बोली लागलेली दिसली. त्याचवेळी या स्पर्धेत संघ खरेदी केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Banglore) फ्रॅंचाईजीने एक मजबूत संघ उभारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शनिवारी (18 फेब्रुवारी) आरसीबीने आपल्या पहिल्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही पहिल्या हंगामात आरसीबीचे नेतृत्व करेल.
आरसीबीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून आपल्या पहिल्या महिला कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. आयपीएलमध्ये आरसीबीच्या पुरुष संघाचा वरिष्ठ फलंदाज तसेच माजी कर्णधार विराट कोहली व विद्यमान कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी स्मृती या हंगामात आरसीबीचे नेतृत्व करणार असल्याचे जाहीर केले. स्मृतीने संघाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले,
“मला या उत्कृष्ट संघाचे नेतृत्व दिल्याबद्दल मी संघ व्यवस्थापनाचे आभार मानते. जगातील सर्वोत्तम चाहते असलेल्या या संघाचे नेतृत्व करण्याची मी वाट पाहत आहे. संघाला यशस्वी बनवण्यासाठी मी 100 टक्के योगदान देईल.”
आरसीबीने काही दिवसांपूर्वीच या संघाची मेंटर म्हणून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या नावाची घोषणा केली होती. तर, न्यूझीलंडचे बेन सॉयर हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील.
WPL साठी आरसीबी संघ-
स्मृति मंधाना (कर्णधार), सोफी डिवाइन, एलिस पेरी, रेणुका सिंह, रिचा घोष, एरिन बर्न्स, दिशा कासट, इंद्राणी रॉय, श्रेयंका पाटील, कनिका आहूजा, आशा शोभना, हीदर नाइट, डेन वॅन नीकेर्क, प्रीति बोस, पूनम खेमनार, कोमल झंझाड, मेगन शूट, सहाना पवार.
(Indian Vice Captain Smriti Mandhana Named First RCB Captain In Womens Premier League)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदान भारताचं, पण हवा लायनची! कसोटीत ‘बाप’ कामगिरी करणारा नेथन दुसराच, पहिल्या स्थानी ‘हा’ भारतीय
आता बास झालं! फ्लॉप शोमुळे राहुल होणार कसोटी संघातून बाहेर? शेवटच्या 9 डावातील कामगिरी लज्जास्पद