बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) या स्पर्धेत भारताला दुसऱ्या दिवशी आंनदाची बातमी मिळाली आहे. आज (३० जुलै) भारताने रौप्य पदकाने खाते उघडले आहे. भारताच्या संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याने ५५ किलोग्राम वजनी गटात हे पदक मिळवले आहे.
महाराष्ट्रातील सांगलीचा असलेल्या संकेत महादेव सरगर (Sanket Mahadev Sargar) याने पुरूषांच्या अंतिम फेरीतच स्थान मिळवले नाही तर त्याने उत्तम कामगिरीही केली आहे. त्याने पहिल्या फेरीत स्नॅच या प्रकारात ११३ किलोग्राम वजन उचलले. तर दुसऱ्या फेरीत क्लीन एंड जर्कमध्ये १३५ किलोग्राम वजन उचलत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.
Congratulations Sanket Mahadev Sargar for opening Team India’s account at the @birminghamcg22 with a 🥈 and a fabulous performance in the Men’s 55kg 🏋🏻♀️ . #ekindiateamindia #B2022 pic.twitter.com/jawkm4uGLj
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2022
संकेत हा या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत जखमी झाला होता. यामुळे तो १३९ किलोग्राम वजन उचलण्यात अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर मलेशियाच्या मोहम्मद अनिकने २४९ किलोग्राम वजन उचलल्याने तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. श्रीलंकेच्या दिलांका कुमाराने कांस्य पदक पटकावले. त्याने २२५ किलोग्राम वजन उचलले होते.
Sanket Sargar wins #TeamIndia's first medal at the Birmingham 2022 Commonwealth Games 🎆👏
He dedicates his 🥈 in men's 55kg weightlifting to all the brave Indians who fought for the country's independence 🇮🇳#EkIndiaTeamIndia | #B2022 pic.twitter.com/Jmpg8NrhHT
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2022
मागीलवर्षी झालेल्या चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण कामगिरी
संकेत हा भारताचा स्टार वेटलिफ्टर आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तो ५५ किलोग्राम वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतो.
त्याने मागच्यावर्षी तशकंद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वरिष्ठ चॅम्पियनशीप गेम्समध्ये चॅम्पियनशीपच्या स्नॅच इव्हेंटमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली होती. त्यावेळी त्याने ११३ किलोग्राम किलोग्राम वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले होते. याबरोबरच त्याने राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावे केला.
बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्ससाठी संकेत कसा ठरला पात्र
तीन वेळेच्या राष्ट्रीय चॅम्पियन २१ वर्षीय संकेतच्या नावावर राष्ट्रीय आणि कॉमनवेल्थमध्ये २५६ किलोग्राम वजन उचलण्याचा विक्रम आहे. त्याने सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये हा पराक्रम केला. यामुळेच तो बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्र ठरला. तसेच त्याने खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता क्रिकेटपटूही वापरू लागलेत चायनीज साहित्य?’, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
मेकॉयचा आळशीपणा नडला! ‘या’ भारतीय फलंदाजाला मिळालं आयतचं जीवदान; पाहा व्हिडिओ
‘तो क्रिकेट खेळायचा तेव्हा तू चड्डीत होता’, सचिनचा अपमान? करणाऱ्या क्रिकेटपटूवर टीका