भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) चे संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. उभय संघांमध्ये ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे ३ सामन्यांची वनडे मालिका (3 Matches ODI Series) खेळली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) पहिल्यांदाच भारताच्या वनडे संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. या सामन्यापूर्वी शनिवारी (०५ फेब्रुवारी) रोहितने पत्रकार परिषद (Rohit Sharma Press Conferance) घेतली असून यादरम्यान त्याने बऱ्याचशा महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत.
पत्रकार परिषदेदरम्यान कर्णधार रोहितला एका पत्रकाराने भन्नाट प्रश्न विचारला. त्यावर रोहितनेही त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
तर झाले असे की, एका पत्रकाराने कर्णधार रोहितला युवा खेळाडूंना वरच्या फळीत संधी देण्याविषयी एक प्रश्न विचारला. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये पहिल्या ३ स्थानांवर युवा शिलेदारांना खेळवण्याबाबत तुझे काय मत आहे? असा प्रश्न त्या पत्रकाराने विचारला.
यावर रोहितने गमतीशीर उत्तर (Captain Rohit On Giving Chace To Youngsters) दिले. तो त्या पत्रकाराला म्हणाला की, म्हणजे तू म्हणतोय की, ईशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत सलामीला पाठवावे आणि मी व शिखर धवनने बाकावर बसावे. असे म्हणून रोहितने हलकेसे स्मितहास्य दिले. तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, त्यांना (ऋतुराज आणि धवन) भविष्यात संधी दिल्या जातील.
हेही वाचा- पहिल्या वनडेत ‘हा’ असेल रोहितचा सलामी जोडीदार, पत्रकार परिषदेत नव्या कर्णधाराचा खुलासा
दरम्यान रोहितने या पत्रकात परिषदेत इतर गोष्टींवरही प्रकाश टाकला आहे. त्याने पहिल्या वनडेत भारताची सलामी जोडी कशी असेल, हेही सांगितले आहे. सलामीवीर शिखर धवन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आणि उपकर्णधार केएल राहुल याच्या पहिल्या सामन्यातील अनुपस्थितीमुळे रोहितसोबत कोण डावाची सुरुवात करेल, हा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु रोहितने पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब केला आहे की, ईशान किशन त्याच्यासोबत सलामीला फलंदाजीला येईल.
ईशान आणि रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून बऱ्याचदा एकत्र खेळले आहेत. त्यामुळे ही सलामी जोडी वनडे क्रिकेटमध्येही असेच प्रदर्शन करताना दिसू शकते.
अशी होणार वनडे मालिका
६ फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेची सुरुवात होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला ही मालिका संपेल. भारत आणि वेस्ट इंडिजमधील तिन्ही वनडे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.
भारताचा वनडे संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या वनडेत ‘हा’ असेल रोहितचा सलामी जोडीदार, पत्रकार परिषदेत नव्या कर्णधाराचा खुलासा
फायनलपूर्वी व्हिडिओ कॉलवर वडिलांशी काय झालं कर्णधार यशचं बोलणं? संघाच्या प्लॅनचाही कोचकडून खुलासा