जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 ते 23 जूनदरम्यान न्यूझीलंड आणि भारतीय संघामध्ये झाला. या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना तीन आठवड्यांचा ब्रेक दिला आहे. या कालावधीत भारतीय संघातील खेळाडू आपल्या परिवारासोबत इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेले आहेत. याचदरम्यान इंग्लंडमध्ये युरो कप देखील खेळला जात आहे. हे सुरू असलेले फुटबॉल सामने पाहण्यासाठी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत गेला होता. मात्र, त्याला सध्या एका कारणामुळे ट्रोल केले जात आहे.
मित्रासोबत फुटबॉल सामने पाहायला गेला रिषभ पंत
जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. या तणावातून बाहेर येण्यासाठी भारतीय संघाला थोडासा ब्रेक दिला आहे. याचदरम्यान भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आपल्या मित्रासोबत फुटबॉल सामने पाहण्यास पोहोचला.
रिषभ पंतने आपल्या ट्विटर अकाउंटवर युरो कपमधील इंग्लंड विरुद्ध जर्मनीचा सामना पाहात असताना मित्रासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रिषभ पंतने मास्क घातले नाही. याच कारणावरून पुन्हा एकदा चाहत्यांनी रिषभवर टीका सुरू केली आहे.
Good experience watching ⚽️. 🏴 vs 🇩🇪 pic.twitter.com/LvOYex5svE
— Rishabh Pant (@RishabhPant17) June 30, 2021
मास्क न घातल्याने सुरू केली चाहत्यांनी टीका
जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा झालेल्या पराभवामुळे चाहते अजूनही खूप रागात आहे. चाहते भारतीय संघातील खेळाडूंवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाही. यादरम्यान रिषभ पंतने एक चूक केली आहे. त्यामुळे चाहते रिषभ पंतवर मोठ्या प्रमाणावर टीका करत आहेत.
युरो कपचे फुटबॉल सामने पाहत असताना रिषभने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यानी मास्क घातले नाही. त्यामुळे त्याच्यावर चाहते मोठ्या प्रमाणावर टीका करत आहेत. काही चाहत्याने रिषभ पंतला टोमणा मारत म्हणाला की, ‘मास्क कुठे आहे तुझा?’ तर काही चाहत्यांनी रिषभ पंतला खेळावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
Mask kha hai?
— Adnan Khan (@AdnanAli623) June 30, 2021
Enjoy.. But.. I Think.. You All Indian Batters Should Watch Yourself As Well. . How You Are Playing Against Good Swing Bowling.. Spend Time In Nets Instead.. Like #ViratKohli You People Just Focusing On Earnings.. And Not On Country's Pride Or Fans Satisfaction.. #Cricket
— TRY (@LifeBeingURSelf) June 30, 2021
Nice. Rishabh – is no one wearing mask there?
— Gautam C Jain (@gautammardia) June 30, 2021
https://twitter.com/NKMalviya19/status/1410087392300601348
https://twitter.com/tsaxena1/status/1410185833387155459
Rishabh yesterday:
"Come on Kane…..Come on Kane…."😂🔥— sb. (@bsudipta062) June 30, 2021
Jacket in summer? I can see Mumbai boy do this but for boy from UK and Delhi it's weird.
— Lokesh (@FakeCricFan) June 30, 2021
https://twitter.com/nareshkumarnet6/status/1410077000098738177
Enjoy the vacation, rest #WTCFinal can be won some other time. 🙃
— Human (@Praveen_Bablu) June 30, 2021
Yha bhi kane (@HKane ) ne jeeta diya..😂😂
— Nits.near.eth 🪻🪼 (@Rajput7Eth) June 30, 2021
अंतिम अंतिम सामन्यातील दोन्ही डावात खराब शॉट मारत बाद झाला
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिषभ पंतकडून सर्वांनाच खूप अपेक्षा होत्या. पहिल्या डावात रिषभ पंतला दुहेरी आकडा देखील पार करता आला नाही. तर दुसऱ्या डावात 41 धावा केल्यावर तो बाद झाला. या दोन्ही डावात रिषभ पंतने चुकीचा शॉट खेळत आपली विकेट दिली.
त्यामुळे अनेक टीकांना सामोरे जावे लागले होते. परंतु कर्णधार विराट कोहलीने रिषभ पंतला पाठिंबा दिला आहे. आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये रिषभ पंतकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची सर्वांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोड टू टोकियो! भारताच्या ‘या’ दोन जलतरणपटूंनी मिळवली ऑलिंपिकची पात्रता