---Advertisement---

आनंदवार्ता! भारतीय महिला क्रिकेट संघाची आयसीसी टी-२० क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप

On: शनिवार, ऑक्टोबर 3, 2020 11:26 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकत्याच जाहीर केलेल्या महिला टी20 क्रमवारीनुसार भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंड क्रिकेट संघाला मागे टाकत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर वनडे क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे.

270 गुणांसह आहे तिसऱ्या स्थानी

आयसीसीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलिया (291 गुण) आणि इंग्लंड (280 गुण) पहिल्या दोन स्थानांवर आहेत. यावर्षी टी-20 विश्वचषकातील अंतिम फेरी गाठणारा भारतीय संघ 270 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. न्यूझीलंड (269) संघ चौथ्या स्थानी आहे.

यावेळी आयसीसीने 2016-17 चे निकाल काढून टाकले आहेत. या व्यतिरिक्त 2017-18 आणि 2018-19 या वर्ष्याचे 50 टक्के निकाल आणि 2019-20 चे 100 टक्के निकाल घेऊन नवीन क्रमवारी तयार केली आहे. ब्राझील संघाने क्रमवारीत सर्वात मोठी प्रगती केली असून तो संघ 11 गुणांनी झेप घेऊन 72 व्या स्थानावर आला आहे, तर मलेशियाची 31 व्या स्थानावरुन 38 व्या स्थानावर घसरण झाली आहे.

वनडे क्रमवारीत दुसरे स्थान कायम

वनडे क्रमवारीत भारत (121 गुण) आणि इंग्लंड (119 गुण) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. सहा वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने 21 वनडे सामन्यांपैकी 20 सामने जिंकल्यामुळे त्यांना आठ गुणांचा फायदा झाला आहे आणि आता त्यांचे 160 गुण असून ते अव्वल क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय संघापेक्षा 39 गुण जास्त आहेत. हा पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांच्या गुणांचा फरक आजपर्यंतच्या क्रिकेटक्रमवारीतील (पुरुष आणि महिला) सर्वाधिक फरक आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---