सोमवारी (२६ जुलै) भारताचा महिला क्रिकेट संघ कॉमनवेल्थ गेम्स २०२२ साठी बर्मिंघमला पोहोचला आहे. बर्मिंघमला पोहोचल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंचे फोटो समोर आले आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासह संपूर्ण संघ फोटोंमध्ये दिसत आहे. दिर्घ काळानंतर भारतीय महिला खेळाडू कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होतील. तत्पूर्वी कॉमनवेल्थ गेम्स आणि भारतीय महिला संघाच्या वेळापत्रकाबद्दल जाणून घेऊ.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये टी२० स्वरूपात (Commonwealth Games 2022) क्रिकेट सामने खेळले जाते. भारतीय महिला संघ (Indian Women Cricket Team) त्यांच्या कॉमनवेल्थ गेम्स अभिनायाची सुरुवात २९ जुलैपासून करेल. भारतीय संघ कॉमनवेल्थ गेम्समधील अ गटाचा भाग आहेत. भारतीय संघाव्यतिरिक्त या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोस या संघाचा समावेश आहे. बार्बाडोस हा मुळात वेस्ट इंडिजचाच संघ आहे. परंतु तो बार्बाडोस नावाने स्पर्धेत सहभागी होणार आहे.
Indian Women's cricket team has reached Birmingham for the Commonwealth Games, all the best for the whole team. pic.twitter.com/7ZBrNmWtof
— Johns. (@CricCrazyJohns) July 25, 2022
Heading to Birmingham for the Commonwealth Games!! 🇮🇳
.#CWG2022 #TeamIndia pic.twitter.com/1LUEhOHCFw— Jemimah Rodrigues (@JemiRodrigues) July 24, 2022
साखळी फेरीत भारतीय संघ (Indian Women’s Commonwealth Games Schedule) आपल्या गटातील ३ संघांविरोधात प्रत्येकी १ सामना खेळेल. जर साखळी फेरीतील कमीत कमी २ सामने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले, तर त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या अपेक्षा आहेत. आणि जर तिन्हीही सामने जिंकण्यात संघ यशस्वी ठरला, तर थेट उपांत्य फेरीचे तिकीट मिळवेल. परंतु जर केवळ १ सामना जिंकण्यात संघाला यश आले, तर त्यांच्यावर या स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावू शकते.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये २९ जुलै रोजी भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होईल. तर भारत आणि पाकिस्तान संघातील डोळ्यांचे पारणे फेडणारी लढत ३१ जुलै रोजी रंगेल. तर अखेरचा साखळी फेरी सामना ३ ऑगस्ट रोजी रंगेल. साखळी फेरी सामन्यांचा थरार संपल्यानंतर ६ ऑगस्टपासून बादफेरी सामन्यांना सुरुवात होईल.
दरम्यान भारतीय महिला संघाच्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील प्रदर्शनावर सर्वांची नजर असेल. मिताली राजच्या अनुपस्थितीत संघ कसे प्रदर्शन करतो आणि बादफेरीपर्यंतचा प्रवास करण्यात यशस्वी होतो की नाही?, हे पाहाण्यासारखे असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त कौतुक करावे असे यश! वयाच्या १८व्या वर्षी टी२०मध्ये शतक ठोकत ‘या’ क्रिकेटरने केला विश्वविक्रम
‘बापू बधू सारू छे’, मॅच विनर अक्षर पटेलचे कर्णधार रोहितकडून गुजराती भाषेत कौतुक
“तो वनडेचा दिग्गज बनतोय”; माजी भारतीय खेळाडूची श्रेयसवर स्तुतीसुमने