---Advertisement---

न भूतो…! धोनी-कोहलीसारख्या भल्याभल्या कर्णधारांना न जमलेला पराक्रम हरमनप्रीतने केला, बनली दिग्गज Captain

On: मंगळवार, सप्टेंबर 26, 2023 8:41 AM
Harmanpreet-Kaur
---Advertisement---

सोमवारचा (दि. 25 सप्टेंबर) दिवस सुवर्णाक्षरात लिहिला गेला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने कामगिरीच अशी केली, ज्याने 140 कोटी भारतीयांची छाती अभिमानाने फुगली. खरं तर, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धेत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार प्रदर्शन करत श्रीलंकेला 19 धावांनी पराभवाचा धक्का दिला. तसेच, देशाला खेळातील पहिले-वहिले सुवर्णपद मिळवून देत इतिहास घडवला. दोन सामन्यांच्या बंदीनंतर परतलेल्या हरमनप्रीतने भारताला सुवर्णपदक जिंकून देण्यासोबतच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भीमपराक्रम केला, जो आजपर्यंत कुठलाच भारतीय कर्णधार करू शकला नाही.

हरमनप्रीत कौर हिचा भीमपराक्रम
भारतीय संघाची दिग्गज खेळाडू हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही महिला क्रिकेटच्या 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व (Harmanpreet Kaur became first indian captain to lead team in 100 t20i matches) करणारी पहिली वहिली कर्णधार बनली आहे. हरमनप्रीतने हा पराक्रम आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 (Asian Games 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गाजवला. भारतीय पुरुष संघाच्या कोणत्याही कर्णधाराला हा पराक्रम गाजवता आला नाहीये.

https://www.instagram.com/p/CxnHJ5ZvJqu/?img_index=1

दुसऱ्या स्थानी धोनी
हरमनप्रीतनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी भारतीय दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचा क्रमांक लागतो. धोनीने टी20 क्रिकेटमध्ये 72 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच, रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 51 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे, तर विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीय संघाचे नेतृत्व करताना एकूण 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

दोन सामन्यांच्या बंदीनंतर कमाल
अलीकडेच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत हरमनप्रीत कौर हिच्यावर पंच आणि खेळाडूंशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आयसीसीने दोन सामन्यांची बंदी घातली होती. त्यामुळे हरमनप्रीत आशियाई क्रीडा स्पर्धा 2023च्या उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात खेळू शकली नव्हती. मात्र, अंतिम सामन्यात तिने पुनरागमन केले आणि भारतीय संघाने इतिहास घडवला.

भारताने घडवला इतिहास
हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध शानदार प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने स्मृती मंधाना (46) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (42) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 20 षटकात 116 धावा कुटल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 98 धावाच करू शकला. अशाप्रकारे भारताने 19 धावांनी हा सामना जिंकत इतिहास घडवला. (indian women cricketer harmanpreet kaur became first indian captain to lead team in 100 t20i matches asian games 2023)

महत्त्वाच्या बातम्या-
लॅबुशेनचा त्रिफळा उडवणारा अश्विनचा ‘तो’ चेंडू चर्चेत कशामुळे? फिरकीपटूने स्वतः सांगितली रणनीती
Asian Games । गोल्ड जिंकल्यानंतर स्मृती मंधानाला आली नीरज चोप्राची आठवण, वाचा काय म्हणाली स्टार फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---