इंग्लंड येथे सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तान संघावर ९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. याबरोबर भारतीय संघाने इंग्लंड, विंडीज पाठोपाठ पाकिस्तानला पराभूत करत ३ सामन्यात ६ गुणांची कमाई केली आहे.
या विजयाबरोबर भारतीय महिला क्रिकेट संघाने काही विश्वविक्रम केले आहेत, त्यातील काही विश्वविक्रम
#१ भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध अपराजित, १० पैकी १० लढती जिंकल्या.
#२ भारतीय संघाने प्रथमच विश्वचषक स्पर्धेत सलग ४ लढती जिंकल्या. २०१३ विरुद्ध पाकिस्तान, २०१७ वि. इंग्लंड, वि. विंडीज, वि पाकिस्तान
#३ भारत महिला विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध ३ लढती खेळला असून ३ही लढती जिंकला आहे.
#४ फेब्रुवारी २०१६ पासून भारतीय संघ २१ पैकी २० एकदिवसीय लढती जिंकल्या आहेत. एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मे २०१७मध्ये
#५ भारताने १० एकदिवसीय लढतींपैकी पाकिस्तानला ६व्यांदा १०० किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर ऑल आऊट केले आहे.
#६ भारतीय गोलंदाजांची महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाजी: एकता बिस्त ५/१८ वि पाकिस्तान. यापूर्वी ५/२१ पौर्णिमा चौधरी १९९७
#७ पाकिस्तान संघ २०१७ मध्ये दोन वेळा भारतीय संघाकडून एकदिवसीय सामन्यांत पराभूत
#८ सर्वाधिक वेळा विजेत्या संघाचा भाग असलेली खेळाडूंच्या यादीत मिताली राज दुसऱ्या क्रमांकावर. एकूण १०४ वेळा. १०८ सामन्यांत विजयी संघाचा भाग असणाऱ्या संघाचा भाग असण्याचा विक्रम कारेन रोलटोनच्या नावावर.
#९ महिला विश्वचषक स्पर्धेत पॉईंट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानावर