---Advertisement---

पहा भारतीय महिला क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूंनी घेतली सेहवागची भेट !

---Advertisement---

भारतीय महिला संघाने इंग्लंड येथे झालेल्या महिला विश्वचषकात जबदस्त कामगिरी केली. त्यामुळे या संघावर सर्वच स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई विमानतळावर आल्यावरही या संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलं होत.

त्यांनतर या संघाने भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जेव्हा खेळाडू त्यांच्या त्यांच्या राज्यात गेले तेव्हा तेथील त्यांची राज्ये सरकारे, चाहते यांनीही त्यांचे सत्कार केले.

परंतु कोणताही खेळाडू जेव्हा मोठी कामगिरी करून येतो त्यानंतर ४-५ दिवसांनी तो भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागची नक्की भेट घेतो. खेळाडूसुद्धा ट्विटर सेहवागला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. सेहवागही कधीही कोणत्या खेळाडूला भेटायला नाही म्हणत नाही.

यावेळी भारतीय महिला संघातील सदस्यांनी सेहवागची भेट घेतली आहे. त्यात भारताची महान गोलंदाज झुलन गोस्वामी, वेदा कृष्णामूर्थी, हरमनप्रीत कौर, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम राऊत यांचा समावेश आहे.

सेहवागने याबरोबर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या या खेळाडूंना भेटणे ही आनंदाची गोष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment