आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधून क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने आंतरराष्ट्रीय टी20 अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला 19 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेचे क्रिकेटमधील पहिले सुवर्णपदकही जिंकले.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 116 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका महिला संघाने 20 षटकात 8 विकेट्स गमावत फक्त 97 धावाच केल्या. त्यामुळे हा सामना भारताने 19 धावांनी नावावर केला.
Gold 🥇 Medal it is for #TeamIndia! 🙌 🙌
The team beats Sri Lanka by 19 runs in the summit clash to bag the top honours. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/dY0wBiW3qA#IndiaAtAG22 | #AsianGames pic.twitter.com/dLEvEf6f97
— BCCI Women (@BCCIWomen) September 25, 2023
श्रीलंकेचे प्रयत्न तोकडे
भारतीय संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून हसिनी परेरा हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 22 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या होत्या. तिच्याव्यतिरिक्त निलाक्षी डी सिल्वा (23), ओशादी रणसिंगे (19) आणि कर्णधार चमारी अटापट्टू (12) यांनीच दोन आकडी धावसंख्या उभारली. इतर एकही फलंदाज 10 धावांचाही आकडा पार करू शकला नाही.
यावेळी भारतीय महिला संघाकडून गोलंदाजी करताना तितास साधू (Titas Sadhu) हिने सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या. तिच्याव्यतिरिक्त राजेश्वरी गायकवाड हिने 2, तर देविका वैद्य, दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
स्मृती आणि जेमिमाची धमाल खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामी फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने सर्वाधिक 46 धावा केल्या. तिने 45 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 4 चौकारांची बरसातही केली. तिच्याव्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिनेही 40 चेंडूत 42 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. इतर कोणत्याही फलंदाजाला 10 धावांचा आकडा पार करता आला नाही, पण स्मृती आणि जेमिमाच्या खेळीमुळे भारताने शंभर धावांचा टप्पा पार केला.
यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना तीन खेळाडूंनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यात इनोका रणवीरा, उदेशिका प्रबोधनी आणि सुगंदिका कुमारी यांच्या नावाचा समावेश आहे. (Indian women team win gold in their first ever cricket event in the Asian Games)
महत्त्वाच्या बातम्या-
हरमनसेनेनं घडवला इतिहास! भारतीय संघाने Asian Gamesमध्ये पटकावलं पहिलं-वहिलं Gold Medal
‘बूम बूम’ बुमराहचा 2019 वर्ल्डकपमधला ‘तो’ रेकॉर्ड, अनेकांना माहितीच नाही; तुम्हीही घ्या जाणून