---Advertisement---

47000 प्रेक्षकांसमोर भारतीय महिला संघाचा व्हिक्टरी लॅप, व्हिडीओ पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान

On: सोमवार, डिसेंबर 12, 2022 1:30 PM
India womens Victory Lap
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेेलिया या महिला क्रिकेट संघात टी 20 मालिका सुरु आहेे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 11 डिसेंबर) नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडीयवर खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रलियाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. भारताच्या या विजयामध्ये स्मृती मंधना हीचा मोलाचा वाटा होता. सुपर ओव्हरमध्ये भारताने बनवलेल्या 20 धावांपैकी 13 धावा स्मृती मंधना हीने केल्या होत्या. या आव्हानाचे प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलिया संघ 16 धावा करु शकला. भारतीय महिला संघाने या विजयानंतर घेतलेल्या व्हिक्टरी लॅपची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मिडीयावर या व्हिक्टरी लॅपचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेे.

भारताच्या विजयानंतर हरमनरप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि भारतीय महिला संघाने हातात तिरंगा घेऊन व्हिक्टरी लॅप केला. यावेळी मैदानात प्रेक्षकांची संख्या 47000 पेक्षाही जास्त होती. यावेळी मैदानात प्रेक्षकांची एवढ्या जास्त प्रमाणात उपस्थिती महिला क्रिकेटच्या लोकप्रियतेचा पुरावा आहे. सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली की, “आम्ही स्वत:वर विश्वास ठेवला आणि लक्ष्य प्राप्त केले. पहिल्या सामन्यात आम्ही बऱ्याच चुका केल्या होत्या. या चूकांमधून आम्ही धडा घेतला. पहिल्या सामन्यात आम्ही फक्त 170 धावा केेल्या होत्या. मात्र, आम्ही विचार केला की जर स्ट्राईक रेट वाढवला तर आपण जास्त धावा करु शकतो.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया या महिला संघात 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये 4 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत 1 बाद 187 धावा केल्या. या आव्हानाचे प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने देखील 5 बाद 187 धावा केल्या. त्यामुळे सामना टाय झाला आणि या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लावण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलिया संघाला 16 धावा करता आल्या. स्मृती मंधना (Smriti Mandhana) ही भारताच्या या विजयाची नायिका ठरली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘संधी मिळत नसली तरी भारताकडूनच खेळणार’, आयर्लंड क्रिकेटच्या प्रस्तावाला संजू सॅमसनकडून नकार
…आणि युवराजचे ते स्वप्न अधूरेच राहिले!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---