---Advertisement---

महिला दिनाच्या दिवशी भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळाली खास भेट, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याची झाली घोषणा

On: सोमवार, मार्च 8, 2021 6:55 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाला एक अनोखी भेट दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी चालू वर्षांत भारतीय संघ इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध कसोटी सामना खेळणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे २०१४ सालानंतर भारतीय महिला संघ पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळतांना दिसेल.

यापूर्वी नोव्हेंबर २०१४ मध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने एक डाव आणि ३४ धावांनी विजय मिळवला होता. थिरूश कामिनी आणि पूनम राउत यांनी या सामन्यात भारताकडून शतक झळकावले होते. तर हरमनप्रीत कौरने सामन्यात एकूण ९ बळी घेण्याची किमया केली होती.

त्यानंतर आता तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकदा महिला संघाला क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्रकारांत आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. अर्थात याबाबतच्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा अद्याप करण्यात आली नाहिये.

दरम्यान, सध्या भारतीय महिला संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. कोरोना विषाणूपश्चात महिला संघाची ही पहिलीच मालिका आहे. मात्र काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. आता दुसरा सामना ९ मार्च रोजी खेळवला जाईल.

महत्वाच्या बातम्या:

देशापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देणार इंग्लिश क्रिकेटपटू?, मुख्य प्रशिक्षकाचे आले मोठे विधान

तर मोहालीत आयपीएलचे सामने का खेळवले जाऊ शकत नाहीत?, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल

महिला दिन विशेष : खेळाची मैदाने गाजवणाऱ्या रणरागिणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---