---Advertisement---

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठे बदल, आता सर्व सामने होणार क्वीन्सलँडमध्ये; पाहा संपूर्ण वेळापत्रक

On: सोमवार, ऑगस्ट 30, 2021 5:47 PM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरियामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या कारणास्तव, आता भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय, तीन टी-20 आणि एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना क्वीन्सलँडमध्येच खेळली जाईल.

याआधी भारतीय महिला क्रिकेट संघ 19 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिला सामना खेळणार होता, परंतु आता ती मालिका दोन दिवसांच्या विलंबाने म्हणजेच 21 सप्टेंबरपासून सुरू होईल. त्याचवेळी, या सामन्यांचे ठिकाणही बदलण्यात आले आहे.

भारतीय महिला संघाचा दौरा एकदिवसीय मालिकेपासून सुरू होणार होता. पहिला सामना सिडनी, नंतर मेलबर्न आणि तिसरा सामना पर्थ येथे होणार होता. पण आता तिन्ही एकदिवसीय सामने क्वीन्सलँड येथे खेळवले जातील. हे सर्व सामने ग्रेट बॅरियर रीफ एरिना येथील स्टेडियमवर खेळले जातील.

दोन्ही संघांमधील एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण आता हा सामना पर्थऐवजी गोल्ड कोस्टच्या मेट्रिकॉन स्टेडियमवर खेळला जाईल. यानंतर याच मैदानावर तीन टी -20 सामनेही खेळले जातील. टी-20 मालिकेतील पहिला सामना 7 ऑक्टोबर, दुसरा 9 आणि तिसरा 10 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.

भारतीय संघ दुबईहून ब्रिस्बेनला पोहोचेल आणि तिथे दोन आठवडे संघास विलगिकरणात ठेवण्यात येईल. याशिवाय न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया येथे राहणारे ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडूंनाही 14 दिवस बिस्बेनमध्ये संघासह विलगिकरणात ठेवण्यात येईल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले म्हणाले की, ‘आम्ही देशभरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि हे स्पष्ट आहे की, सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मूळ वेळापत्रक बदलावे लागले. ऑस्ट्रेलियन आणि भारतीय खेळाडूंना विलगिकरणात ठेवण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि क्वीन्सलँडमध्ये ही मालिका आयोजित केल्याबद्दल आम्ही राज्य सरकारचे आभारी आहोत.’

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक:

एकदिवसीय सामने
21 सप्टेंबर: ग्रेट बॅरियर रीफ एरिना, मॅके – पहिला वनडे
24 सप्टेंबर: ग्रेट बॅरियर रीफ एरिना, मॅके – दुसरा वनडे(दिवस-रात्र)
26 सप्टेंबर: ग्रेट बॅरियर रीफ एरिना, मॅके – तिसरा वनडे

कसोटी सामना
30 सप्टेंबर -3 ऑक्टोबर: करार स्टेडियम, गोल्ड कोस्ट (पिंक-बॉल कसोटी)

टी-20 सामने
7 ऑक्टोबर: मेट्रिकॉन स्टेडियम, गोल्ड कोस्ट – पहिला टी-20
9 ऑक्टोबर: मेट्रिकॉन स्टेडियम, गोल्ड कोस्ट – दुसरा टी-20
10 ऑक्टोबर: मेट्रिकॉन स्टेडियम, गोल्ड कोस्ट – तिसरा टी-20

महत्त्वाच्या बातम्या – 

अरेरे! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने जिंकलेले कांस्यपदक झाले ‘अमान्य’

मयंती लँगरने पती स्टुअर्ट बिन्नीचा ‘तो’ फोटो शेअर करत चाहत्यांना टाकले गोंधळात

रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली खेळणार का? श्रेयस अय्यरने दिले ‘असे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---