---Advertisement---

महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर होतोय कौतुकाचा वर्षाव, लोक म्हणाले, ‘हे खरेखुरे कबीर खान’

---Advertisement---

क्रीडाविश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकचा थरार जपानची राजधानी टोकियो येथे सुरू आहे. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी (२ ऑगस्ट) भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील उपांत्यपुर्व सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभुत करत त्यांनी पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला.

गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या साहाय्याने भारताने ३ वेळच्या ऑलिंपिक विजेत्या ऑस्ट्रेलिया हॉकी संघाला १-० ने पराभूत केले. यानंतर भारतीय महिला खेळाडूंसह संघाचे प्रशिक्षक सोर्ड मार्जेन यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांची तुलना प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या चक दे सिनेमातील भूमिकेशी करण्यास सुरुवात केली.

मार्जेन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक सोर्ड मार्जेन यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत. तसेच, यानंतर त्यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली. ज्यामध्ये लिहिले की, ‘सॉरी फॅमिली.. मी आता आणखी काही काळानंतर येईल’

https://twitter.com/SjoerdMarijne/status/1422070304252129284

मार्जेन यांचे कौतुक करताना सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, ‘भारतीय महिला संघाला बदलणारे दोन चेहरे कबीर खान (पडद्यावर) सोर्ड मार्जेन (प्रत्यक्षात)

आणखी एका चाहत्याने म्हटले, ‘चक दे सिनेमा खरा ठरत आहे. मार्जेन यांच्या प्रतिक्रिया अगदी तशाच आहेत.’

https://twitter.com/TuShahRukh/status/1422084992482430979

शाहरूख खानने निभावली होती हॉकी प्रशिक्षकाची भूमिका
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याने २००७ मध्ये आलेल्या चक दे या हिंदी चित्रपटात भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक कबीर खान अशी भूमिका निभावली होती. अनेक अडचणींचा सामना करत भारतीय संघ हॉकी विश्वचषक जिंकतो व कबीर खान त्यांना कसे प्रेरित करतो, अशी चित्रपटाची कथा होती. आजही हा चित्रपट अनेक क्रीडापटूंना प्रेरणा देत असतो.

दुसरीकडे, हॉलंडचे माजी खेळाडू राहिलेल्या सोर्ड मार्जेन यांनी २०१७ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. २०१८ मध्ये ते पुरुष संघाचे देखील प्रशिक्षक होते. मात्र, त्यांच्याकडे पुन्हा महिला संघाची जबाबदारी देण्यात आली. अनेक वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यानंतर ही मार्जेन यांनी संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेतली आहे ‌

महत्त्वाच्या बातम्या – 

स्टार्कचा भाऊ ऑलिंपिकच्या फायनलमध्ये, ऑसी क्रिकेटपटूंनी सराव सोडून बांगलादेशमधून केले चीअर

Video: टीम इंडियाच्या सरावाच्या नानाविध तऱ्हा, रोहितच्या अनोख्या कल्पनेने खेळाडूही झाले लोटपोट

Video: भावनिक क्षण! भारतीय हॉकीपटूंचा ग्रेट ब्रिटनवर ‘विक्रमी’ विजय अन् समालोचकाला कोसळलं रडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---