---Advertisement---

Video: भावनिक क्षण! भारतीय हॉकीपटूंचा ग्रेट ब्रिटनवर ‘विक्रमी’ विजय अन् समालोचकाला कोसळलं रडू

On: सोमवार, ऑगस्ट 2, 2021 4:02 PM
---Advertisement---

टोक्यो ऑलिंम्पिक 2020 मध्ये भारतासाठी रविवारचा (01 ऑगस्ट) दिवस विशेष राहिला. एका बाजूला पी व्ही सिंधूने चिनी खेळाडू ही बिंग जियाओला माथ देत कांस्य पदक जिंकले. दुसरीकडे भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला 3-1 चा फरकाने हरवले. यासह भारतीय संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे. त्यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे.

रविवारी भारताचा ग्रेट ब्रिटन विरुद्ध सामना होता. भारताने या सामन्यात ग्रेट ब्रिटनला हरवताच सामन्याच्या दोन्ही समालोचकांना भावना अनावर झाल्या होत्या. दरम्यान त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. दोघांनीही एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. समालोचक सुनील तनेजा आणि त्यांच्या सोबत सिद्धार्थ पांडे हे दोघे विजयानंतर मोठ्याने रडत सामन्याचे समालोचन करत होते.

समालोचक सुनील तनेजाने म्हटल्याप्रमाणे, “2006 मध्ये जगविर सिंग ओली सरांसोबत मी पहिल्या हॉकी सामन्याचे समालोचन केले होते. त्यानंतर या 15 वर्षांत असा आनंद कधीच मिळाला नाही; जो आज मिळाला आहे. कारण भारत आज ग्रेट ब्रिटनला हरवून उपांत्य फेरीत पोहचला आहे. 1972 नंतर प्रथमच भारताने ऑलिंम्पिक उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे.”

ग्रेट ब्रिटन विरुद्धच्या सामन्यात दिलप्रीत सिंगने 7 व्या,  गुरजंत सिंग ने 16 व्या आणि हार्दिक सिंगने 57 व्या मिनिटाला गोल केले होते. ब्रिटनसाठी एकमात्र गोल सेम्मुल वार्डने 45 व्या मिनिटाला केला होता. उपांत्य फेरीत भारताचा सामना विश्वविजेत्या बेल्जियमसोबत आहे . बेल्जियमने 3 ऑगस्टला स्पेनला 3-1 च्या फरकाने हरवले आणि उपांत्य फेरी गाठली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियावर १-० ने मात करत उपांत्य फेरीत मारली धडक

खुशखबर! १९७२ नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय

ऑलिंपिकच्या तयारीमुळे वडिलांना शेवटचे पाहू शकली नव्हती वंदना कटारिया; आता मेडल जिंकून द्यायचीय श्रद्धांजली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---