21 जुलैपासून इंग्लंडमध्ये महिला हॉकी विश्वचषकाला सुरवात होत आहे. भारतीय महिला हॉकी संघ 2018 च्या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी रविवारी (15 जुलै) लंडनला रवाना झाला.
या विश्वचषकाच्या 21 जुलैला सलामीच्या सामन्यात भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध खेळून विश्वचषकाला सुरवात करणार आहे.
भारताच्या 21 सदस्सीय संघात कर्णधार राणी रामपाल आणि दीपिका वगळता बाकी सर्वांचा हा पहिला विश्वचषक असेल.
भारतीय संघ या स्पर्धेच्या ब गटात समाविष्ट आहे. या गटात भारताबरोबरच इंग्लंड, अमेरिका आणि आयर्लंड संघाचा समावेश आहे.
“भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी उत्सुक आहे. गेल्या वर्षी एशिया कप स्पर्धेच्या विजयापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. मी आणि दीपिका वगळता या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचा हा पहिला विश्वचषक आहे.” इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय कर्णधार राणी रामपाल असे म्हणाली.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सला मिळणार क्रिकेट विश्वचषक विजेत्यांपेक्षा १०पट जास्त बक्षिस
-फिफा विश्वचषकात असा कारनामा करणारे फ्रान्सचे प्रशिक्षक केवळ तिसरे माजी खेळाडू