---Advertisement---

दुर्दैव! ग्रेट ब्रिटनकडून भारतीय महिला संघाचा ४-३ ने पराभव; भंगले पहिले ऑलिंपिक पदक पटकावण्याचे स्वप्न

---Advertisement---

भारताच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करत देशाला ४१ वर्षानंतर ऑलिंपिकचे पदक मिळवून दिले. यानंतर आता शुक्रवारी (६ ऑगस्ट) कांस्य पदकाचा सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ग्रेट ब्रिटन संघात पार पडला. या सामन्यात रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या ब्रिटन संघाने ४-३ने विजय मिळवला, आणि रौप्य पदक खिशात घातले. यासोबतच पहिल्यांदाच ऑलिंपिक पदक मिळवण्याचे भारताचे स्वप्नही भंगले. या ऑलिंपिकमध्ये भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पहिल्या क्वार्टरच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी दमदार खेळ दाखवला. ब्रिटनने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र, भारताने याचा चांगला बचाव केला. यानंतर भारताने पुनरागमन करत ब्रिटनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. (Indian Women’s Hockey team loses to Great Britain, 4-3 in the Bronze Medal match)

यानंतर सामन्याच्या १० व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारताने ब्रिटनला या पेनल्टी कॉर्नरवरही यश मिळू दिले नाही. यादरम्यान गोलकीपर सविता पुनियाने शानदार बचाव केला.

पहिला क्वार्टर संपल्यानंतरही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे स्कोर ०-० ची बरोबरी झाली.

यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या ६० सेकंदातच म्हणजेच १६ व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने पहिला गोल करत १-० ने आघाडी घेतली. एलिना शियन रेयरचा शॉट रोखण्याच्या प्रयत्नात भारतीय डिफेंडर दीप ग्रेस एक्काच्या स्टिकने गोल झाला.

सामन्याच्या २४ व्या मिनिटाला सारा रॉबर्टसनने गोल केला आणि आपल्या संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली.

यानंतर मात्र भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. गुरजीत कौरने जबरदस्त दोन गोल केले. तिने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरून केले. गुरजीतने २ मिनिटांच्या आतच हे दोन गोल केले. तिने पहिला गोल २५ व्या मिनिटाला, तर दुसरा गोल २६ व्या मिनिटाला केला. यासह भारताने ग्रेट ब्रिटनची बरोबरी साधत स्कोर २-२ असा केला.

यानंतर पहिल्या हाफमध्ये भारतीय महिला संघाकडून सामन्याच्या २९ व्या मिनिटाला वंदनाने शानदार गोल करत ३-२ ने आघाडी मिळवली. खरं तर वंदनाचा हा या ऑलिंपिकमधील चौथा गोल होता.

सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या ५ मिनिटामध्येच म्हणजेच सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने गोल केला. ब्रिटनची कर्णधार हॉली पिअर्न वेबने या ऑलिंपिकमधील आपला पहिला गोल करत सामन्यात ३-३ ने बरोबरी साधली.

ब्रिटनने पुन्हा एकदा आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरनंतर चौथ्या क्वार्टरमध्येही त्यांनी भारतावर वर्चस्व राखले. ब्रिटनने ४८ व्या मिनिटाला गोल केला आणि ४-३ ने आघाडी घेत सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

-मेडल अन् मनंही जिंकले! विजयाच्या जल्लोषातही भारतीय हॉकीपटूनीं दाखवली खिलाडूवृत्ती, जर्मन खेळाडूंचे केले सांत्वन

-ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजयानंतर गोलपोस्टवर का बसला श्रीजेश? स्वत:च केलाय खुलासा

-भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेस ‘या’ कारणामुळे आहे सीएसके संघाचा चाहता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---